परमपुज्य सदगुरू चिले महाराज श्री क्षेत्र जेऊर ते श्री दत्त मंदिर संस्थान मोर्वे पायी पालखी रथ सोहळा

by Admin

पन्हाळा प्रतिनिधी:दत्तात्रय बोबडे
परमपुज्य सदगुरू चिले महाराज यांच्या श्री क्षेत्र जेऊर ते श्री दत्त मंदिर संस्थान मोर्वे पायी पालखी रथ सोहळा बुधवार दि. 15 जानेवारी सुरू होत असून चिले भक्तानी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी मोर्वे ता.खंडाळा येथील दत्त मंदिर संस्थानतर्फे
परमपुज्य सदगुरू चिले महाराज यांचे भक्तगण चिले महाराज यांच्या जन्मगाव जेऊर ता.पन्हाळा ते मोर्वे पर्यंत पायी रथ पालखी सोहळा आयोजन करतात.1984 साली चिले महाराज यांचे मोर्वे गावी आगमन झाले होते त्यापासुन दत्त मंदीर संस्थानतर्फे या सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.मकर संक्रांती पासून हा सोहळा सुरू होत होत असून बुधवार दि.15 पासून जेऊर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पालखी सोहळ्यास सुरूवात होईल. जेऊर गावातून भव्य मिरवणूक झाल्यानंतर रात्री आरती सोहळा संपन्न होईल आणि महाप्रसाद होईल.
दुसर्या दिवशी परमपुज्य सदगुरू चिले महाराज समाधी मंदिर श्री श्रेत्र पैजारवाडीहून पालखीचे प्रस्थान होईल.
पैजारवाडी मार्गे रथसोहळा मार्गस्थ होऊन कोल्हापूर येथे पोहोचेल. कोल्हापूर येथील पंचगंगा घाटावरील सिध्देश्वर महाराज मंदिरात मुक्काम होणार असून शुक्रवारी माऊलींच्या रथाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर त्र्यंबोली माता टेंबलाई मंदिर येथे मुक्काम होणार आहे. शनिवारी टेंबलाई मंदिरातून पालखी प्रस्थान होऊन टोपमार्गे वाठार येथे पोहोचेल. रविवार दि.19 रोजी वाठारमधून कामेरीमार्गे हा पालखी सोहळा पेठ नाका येथे पोहोचेल. सोमवारी पेठ नाका येथून पालखीचे प्रस्थान होत असून कराड येथे पोहोचल्यानंतर माऊलींच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी कराड,वराडे,उंब्रज पाटण मार्गे पायी पालखी सोहळा दत्त मंदिर काशिळ येथे मुक्काम करेल.बुधवारी दत्त मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर अंजिक्यतारा साखर कारखाना पोलीस करमणूक केंद्र, जिल्हा तालीम संघमार्गे पालखी सोहळा सातारा येथे मुक्काम करेल. गुरुवार सातारा, लिंबफाटामार्गे प्रस्थान झाल्यानंतर उडतारे येथे मुक्काम होईल.तर शुक्रवार 24रोजी उडतारे येथून कृष्णामाईत श्री. पादुकांचा स्नान सोहळा होईल. त्यानंतर भुईंजमध्ये भव्य मिरवणूकीने पायी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येईल व खंडाळा येथे मुक्काम होईल. शनिवारी खंडाळा, म्हावशीमार्गे काळभैरव मंदिरात पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. रविवारी काळभैरव मंदिरातून प्रस्थान झाल्या नंतर भव्य मिरवणूकीने दत्त मंदिर देवस्थान मोर्वे येथे पायी पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाईल.नगरप्रदक्षिणानंतर पालखी सोहळ्याची सांगता होईल.या संपूर्ण पालखीमार्गावर विविध भजनी मंडळे सेवा देणार असून दत्त मंदीर देवस्थानचे माजी अध्यक्ष हरिभाऊ आनंदराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ भव्य ढोल लेझीम स्पर्धा होणार आहेत तरी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment