212
जुलै ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापुर आला होता.नदीकाठच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कित्येक घरांची पडझड झाली. हा महापुर ओसरल्यावर साथीच्या आजाराने नागरिकांचे आरोग्य बिघडले. अशा परिस्थितीत गोरगरीब नागरिकांना औषध उपचारांचा खर्च परवडत नव्हता.यावेळी आळवे (ता.पन्हाळा) येथे रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्त रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये येथील विधवा महिला श्रीमती शांताबाई लहू लाड यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच त्याना मोफत औषधे देण्यात आली.त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारले आणि त्यांचा औषध उपचाराचा खर्च वाचला.
श्रीमती. शांताबाई लहू लाड या आळवे ता.पन्हाळा जि. कोल्हापूर येथे राहतात. ही शेतकरी महिला विधवा आहे.त्यांची एक एकर जमीन आहे.शेती बरोबरच त्या उदरनिर्वाहसाठी शेळीपालन करतात.पावसाळ्यातील या महापुराचा फटका आळवे गावाला पण बसला होता. या महापुरात नदीकाठच्या ऊस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कित्येक घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे काही ग्रामस्थांना स्थलांतर व्हावे लागले. अनेक घरांची पडझड झाली.या पुरपरिस्थितीमध्ये गावचा इतर गावांपासून संपर्क तुटला होता. या काळामध्ये शासनाने व इतर सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींनी मदत केली.पूर ओसरल्यावर गावात सर्व ठिकाणी दुर्गंधी पसरली होती.नदीचे पाणी गढूळ होऊन दूषित झाले.त्यामुळे गावातील लहान मुले व वृद्ध लोकांची आरोग्य बिघडले होते. या प्रतिकूल वातावरणाचा श्रीमती. शांताबाई लहू लाड यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम झाला. दुर्गंधीचा त्रास होत होता.शांताबाईना अंगात ताप , थंडी, खोकला या प्रकारचा त्रास होत होता. त्यांनी जवळच्या खासगी दवाखान्यात डॉक्टरना दाखवले .डॉक्टरांनी तपासण्या करून औषध लिहून दिली.खाजगी दवाखान्यामध्ये उपचार केले . त्यामुळे त्यांचा थोडाफार त्रास कमी झाला परंतु औषधांचा खर्च जास्त होत होता साधारणता 1000 रुपये खर्च आला. या दरम्यान गावामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये श्रीमती. शांताबाई लहू लाड यांनी डॉक्टर कडून तपासणी करून घेतली.औषधोपचार करून घेतला तो पण मोफत तपासणी व औषधे मिळाली. या औषधामध्ये ताप थंडी, व खोकला यावरील औषधाचा डोस 15 दिवसाचा मिळाला. पुर येऊन गेल्यानंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती शांताबाईंना डॉक्टरांच्याकडून मिळाली. तसेच कल्शियम गोळ्या, व्हीटामीनची बाटली मिळाली. त्यामुळे त्यांचा ताप , खोकला बरा झाला. या शिबिरात उपचार व मोफत औषध मिळाल्यामुळे गुडघ्याची समस्या कमी झाली. थकवा येणारा कमी झाला. यावरील सर्व औषधे मोफत मिळाली त्यामुळे श्रीमती. शांताबाईना जो खाजगी दवाखान्यामद्धे खर्चा होत होता. तो कमी झाला. जवळ जवळ त्यांचा दवाखान्यातील 1000 ते 1500 रुपये होणारा खर्च कमी झाला. आळवे गावात पूरग्रस्तांनासाठी रिलायन्स फौन्डेशनने घेतलेल्या या महत्वपूर्ण आरोग्य शिबिराचे आयोजन केले. आणि या आरोग्य शिबराचा फायदा अनेक पूरग्रस्त रुग्णांना झाला आहे.
या शिबिरात माझ्या सारख्या गरीब विधवा महिला , लहान मुले व वयोवृद्ध लोकांचे मोफत आरोग्य तपासणी केली . तसेच औषधे मोफत दिली याबद्दल मी रिलायन्स फाउंडेशन या संस्थेची खूप खूप आभारी आहे. या प्रकारची सेवा रिलायन्स फाउंडेशन कडून कायम मिळावी अशी मी रिलायन्स फौन्डेशनकडे विनंती करते. तसेच मला रिलायन्स फाऊंडेशनचा टोल फ्री क्रमांकाची माहिती मिळाली. तरी मला रिलायन्स फौन्डेशनचा टोल फ्री क्रमांकाचा (१८००४१९८८००) वापर करत आहे. या मोफत टोल फ्री क्रमांक वरून आरोग्य विषयी, शासकीय योजनेविषयी माहिती या सारखी आवश्यक माहिती मी मिळवत जाईल. असे श्रीमती. शांताबाई लहू लाड यांनी यावेळी सांगितले.
Sent from OPPO Mail