जेऊर येथील शाहिरी महोत्सवात शंभरावर शाहिरांचा सन्मान
पन्हाळा (प्रतिनिधी): शब्द सामर्थ्यामुळे शंभर वर्षानंतरही आण्णा भाऊंचे विचार समाजासाठी आजही आदर्शवत आहेत असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले जेऊर ता पन्हाळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ३५ व्या पश्चिम महाराष्ट्र शाहीर महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते वस्त्रोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष कर्णसिंग गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.जेऊर सत्कार्य व संवर्धन मंडळाचे कार्याध्यक्ष सुभाष माने यांनी स्वागत केले यावेळी कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील अनेक नामवंत शाहीरांचा मानाचा प.पु.सद्गुरू चिले महाराज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आ.श्री. कोरे म्हणाले, राज्यभर अण्णाभाऊंची जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमाने जन्मशताब्दी वर्ष साजरी होत असताना जेऊर ग्रामस्थानी अण्णाभाऊंच्या स्वप्नातील लोककला जतन करणाऱ्या शाहिरांचा सन्मान करत राज्यात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे याची प्रेरणा घेऊन उद्याच्या काळात या कलेकडे नवयुवकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल यावेळी आमदार कोरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा अण्णाभाऊंची पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सुरभी चे प्रमुख प्राध्यापक आनंद गिरी व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष भिमराव पाटील यांनी केले याप्रसंगी वस्त्रोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष कर्णसिंह गायकवाड, माजी सभापती अनिल कंदूरकर, शाहूवाडीचे माजी उपसभापती महादेवराव पाटील साळशीकर ,जेऊर सरपंच प्रियांका महाडीक, विजयसिंह पाटील अभयसिंग नलवडे, मारुती पाटील, दत्ता पाटील, बाबुराव पाटी,ल महिपती पाटील, कोल्हापूर शाहिर परिषदेचे अध्यक्ष शामराव खडके, शिवशाहीर राजू राऊत ,उत्तम महाडिक,दत्ता बोबडे, यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सुमारे शंभरावर शाहिरांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, स्वागत उत्तम कंदूरकर यांनी केले तर आभार उपसरपंच धोंडीराम पाटील यांनी मानले या उत्सवात उपस्थित शाहिरांनी राष्ट्रीय पोवाडा,कवने,गोंधळ भेदिक कलगीतुरा आधी लोककला सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली
या शहिराचा झाला सन्मान- शाहीर विठ्ठल टिपुगडे,रामचंद्र जाधव,दत्तात्रय चूयेकर,बंडा भोसले,बदाम ढेंगे, एकनाथ पाटील,शिवाजी वरेकर,नेताजी सावंत,विश्वास पाटील,,बाळासाहेब पाटील हरिभाऊ घोंगडे,सर्जेराव संगपाळ,समशेर पाटील,अजित आयरेकर,राजू पाटील,निवृत्ती कुंभार,आलम बागणीकर,
(अण्णाभाऊंना जातीपातीत न अडकवता त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांची सामूहिक प्रयत्न सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावा असे विनय कोरे यांनी सागितले)
142