तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीतील मेकॅनिकल च्या रोहन जवंजाळ ची असिस्टन्ट कमिशनर ऑफ पोलीस पदावर नियुक्ती
वारणानगर (प्रतिनिधी) येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील रोहन जवंजाळ या विद्यार्थ्यांची असिस्टन्ट कमिशनर ऑफ पोलीस (ए. सी. पी. ) पदावर नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याला २४५ वी रँक मिळाली. अकलूज या गावाचा रहिवासी असलेल्या रोहन ने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सुराज्य फौंडेशन तर्फे घेण्यात येत असलेल्या ‘गुणवंतांचा सत्कार’ कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अभ्यासास सुरवात केली, त्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, रजिस्ट्रार डी. एस. ठोंबरे, विभाग प्रमुख डॉ. ए. एस. तोडकर यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशसेवा करण्याची तुम्हाला हि सुवर्ण संधी मिळाली असून त्याचे सोने करा, आपले, आपल्या कुटुंबाचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असा मौलिक सल्ला या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. आपले मनोगत व्यक्त करताना रोहन जवंजाळ याने महाविद्यालय, पालक व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विभागातील प्रा. पी. आर. पाटील, प्रा. ए. एम. पाटील, सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
146
previous post