कोल्हापूर

बहिरेवाडी जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपट मोफत

by संपादक

बहिरेवाडी जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपट मोफत
वारणानगर (प्रतिनिधी) : सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेला तान्हाजी हा चित्रपट बहिरेवाडी (ता.पन्हाळा) जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे बहिरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मोफत दाखविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल आवड निर्माण होऊन त्याच्या अंगी धाडस,शौर्य निर्माण व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदार तान्हाजी मालुसरे यांचा गौरवशाली इतिहासावर चित्रित तान्हाजी हा चित्रपट जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी मिळवून देणारी कोल्हापूर जिल्हातील पहिली शाळा आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी स्वखर्चाने हा चित्रपट कोडोली येथील वसंत चित्र मंदीर येथे दाखवीला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी वसंत चित्र मंदीरचे मालक मनोज कोडगुले,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव,तानाजी सरनाईक,प्रदिप चव्हाण,प्रशांत पाटील,राहुल दुर्गाडे,कुमार कणसे यांच्यासह आदी मान्यवर विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.


You may also like

Leave a Comment