सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण
कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी पात्र युवक-युवतींसाठी दिनांक 12 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी दिली. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Googal Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करून त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊल लोड करून त्यांचीही दोन प्रतिमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरून आणावे. केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला/ मुलाखतीस येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे. 0253-2451031 आणि 2451032 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन श्री. सासने यांनी केले आहे.
176