132
कोल्हापूरच्या ‘देशी’ लघुपटास फिल्म फेअरसाठी नामांकन पुरस्कारासाठी मतदान करण्याचे आवाहन
कोल्हापूर (प्रतिनिधी)कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या ह्रदयस्पर्शी ‘देशी’ या लघुपटास फिल्म फेअर पुरस्कार 2020 साठी नामांकन मिळाले आहे. लघुपटास पुरस्कार मिळण्यासाठी आपले मतदान मोलाचे ठरणार आहे.यासाठी www.filmfare.com/awards/short-films-2020/finalists/deshi/3558 या संकेतस्थळाला भेट देऊन मतदान करण्याचे आवाहन दिग्दर्शक रोहित बापू कांबळे यांनी केले आहे. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ प्रस्तुत राजेंद्रकुमार निर्मित लघुपटाची कथा मनाला स्पर्श करणारी असून हा लघुपट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. लघुपटामध्ये कोल्हापूरच्या नवोदित कलाकार, तंत्रज्ञ यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.