कोल्हापूर

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट वार्षिक चित्र प्रदर्शन

by संपादक

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट वार्षिक चित्र प्रदर्शन
कोल्हापूर (प्रतिनिधी) दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये अभिजात चित्र कलेचे शिक्षण घेणाऱ्या सर्वच विध्यार्थी व विद्यार्थिनीच्या शैक्षणिक वर्षातील निवडक कलाकृती कला रसिकांच्या प्रतिक्रिया आजमावण्या साठीचे चित्र प्रदर्शनाचे दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होत आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयच्या मार्फत आयोजित राज्य कला प्रदर्शनात प्रतिष्ठेची निवड झालेल्या कलाकृती मध्ये फौंडेशन वर्गातून वेद वायचळ, धोंडी ढवळे, ऋतुजा जाधव, प्रथमेश पाटील, आदित्य पोतदार, प्रथमेश काजवे, साक्षी पांगीरे, केदार पवार, कैलास मसुरकर, सानिका नाईक, इंटर वर्गातून अरिहत किनिंगे, ऍडव्हान्स वर्गातून राहुल कोकितकर, डिप्लोमा वर्गातून अक्षय जाधव, प्राप्ती लोखंडे, पंकज गवंडे, वैभव पाटील, आकाश मोरे तसेच इलेमेंटरी वर्गातुन प्रनोती संपत चौगुले या विद्यार्थीनी ची पुरस्कार प्राप्त स्तीरचित्र कलाकृती देखील बघावयास मिळेल. या प्रसंगी महाविद्यालय अंतर्गत वार्षिक बक्षीस वितरण व मान्यवरांचे मार्गदर्शन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास वत्सलाताई पाटील,दळवीज आर्ट्स एज्युकेशन सोसायटी चे मा. अध्यक्ष पांडुरंग पाटील, सेक्रेटरी अर्चनाताई आंबीलढोक, विश्वस्त माजी आमदार बाबासाहेब पाटील, प्राध्यापिका सरीताताई माने, वसंतराव देशमुख, अँड. धनंजय माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कला प्रदर्शन कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, कला दालन येथे मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२० अखेर सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ पर्यंत सर्व कला रसिकाना पाहण्यासाठी खुले असेल.You may also like

Leave a Comment