वारणा महाविद्यालयात ग्रंथालय व्यवस्थापन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण कोडोली (प्रतिनिधी) वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये ग्रंथालय व्यवस्थापन कोर्समध्ये एकूण सत्तावीस विद्यार्थी-विद्यार्थिनी यशस्वी झाले त्यांना प्राचार्या डॉ .सुरेखा शहापुरे आणि प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समन्वयक डॉ मनोहर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .यावेळी यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनी डॉ .संदीप जाधव आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते . विद्यार्थ्यांच्या वतीने कल्याणी धुमाळ, विशाल काशीद, आकाश माने यांनी मनोगत व्यक्त करताना लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही स्वरूपात प्रशिक्षण मिळाल्याने ते निश्चितच उपयुक्त असल्याचे सांगितले. प्रशिक्षणामध्ये कल्याणी धुमाळ, प्रीती माळी, आकाश माने यांनी विशेष गुणवत्तेसह अनुक्रमे पहिले तीन क्रमांक प्राप्त केले. दहा दिवस चाललेल्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून डॉ.ए.टी.लाड, प्रा.पी.जी. पाटील,डॉ. एम .जी.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ग्रंथालय कर्मचारी प्रकाश मोरे यांनी आपले कामकाज सांभाळून प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करत असल्याचे प्राचार्या डॉ.शहापुरे यांनी सांगितले.आभार प्रकाश चिकुर्डेकर यांनी मानले