वारणा साखरचे संचालक आनंदराव पाटील यांचे निधन वारणानगर (प्रतिनिधी )येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द ता. वाळवा येथील विविध सर्व सहकारी संस्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदराव उर्फ प्रकाश पाटील (दादा) (वय ६२ )यांचे आज रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊवाजता ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झाले असून त्यांच्या निधनाने वारणा परिसरावर शोककळा पसरली असून गांवात अंत्ययात्रा काढून त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. वारणा साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन, सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्वर्गीय साहित्यप्राज्ञ बाजीराव बाळाजी पाटील यांचे ते जेष्ठ चिरंजीव, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांचे ज्येष्ठ बंधू होत. आनंदराव पाटील हे ऐतवडे खुर्द मधील विविध सहकारी संस्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच सांगली जिल्हा सहकारी बोर्ड, गुलाबराव पाटील ट्रस्ट, सांगली मुद्रणालय, तसेच पश्चिम महाराष्ट्र सहकारी मंडळाचे विश्वस्त अशा विविध पदावर ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते, त्यांनी राजारामबापू , दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्यात शेती अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले होते सर्वत्र मनमिळावू स्वभावाचे होते, त्यांच्या निधनाने मार्गदर्शक विविध संस्थेवर मार्गदर्शकाची पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा, मुलगी, सुन नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे.रक्षा विसर्जन मंगळवार दि.१८ रोजी सकाळी १० वाजता ऐतवडे खुर्द ता. वाळवा येथे आहे.
100
previous post