यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर काखे येथे संपन्न वारणानगर (प्रतिनिधी)येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर काखे (ता. पन्हाळा) येथे मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने संपन्न झाले. महाविद्यालयातील १०० हून अधिक स्वयंसेवकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. ७०विद्यार्थिनीं स्वयंसेवीकांची संख्या लक्षणीय होती. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आम.डॉ. विनय कोरे , प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम, गावचे कार्यकर्ते दीपक पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. सुरेखा शहापुरे, उपप्राचार्य पी. एस. पाटील, अमर पाटील, दिलीप पाटील, प्रबंधक बी. जे. लाडगावकर, आदिनाथ नलवडे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. सी. आर. जाधव, डॉ.आर. पी. कावणे यांनी काम पाहिले. आठ दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये पूर क्षेत्र परिसराची स्वच्छता व डागडुजी, शाळा आणि गाव परिसरांमध्ये १२५ हून अधिक खड्डे खणून वृक्षारोपण, गावातील अंतर्गत रस्ते, गटरी, बाजार कट्टे, भैरवनाथ व महादेव मंदिर परिसर स्वच्छता इत्यादी श्रमाची कामे विद्यार्थी स्वयंसेवकांनी पार पाडली. याच बरोबर प्रा. उमेश जांभोरे, डॉ.आर.बी. पाटील, प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्रा. डॉ. सर्जेराव जाधव, डॉ. प्रकाश राऊत यांनी अनुक्रमे आजची आंदोलने, पाणी व्यवस्थापन, संस्काराची शिदोरी, मोबाइल शाप की वरदान, आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील संपन्न चर्चासत्रात सहभाग नोंदविला. डॉ. भीमराव वानोळे, डॉ. आप्पासाहेब भुसनर, डॉ.बी.एस. शिर्के,प्रा. वैशाली बुढे, प्रा. सत्यनारायण आरडे यांनी अनुक्रमे मूल्यशिक्षण, युवा पिढी, अध्यात्म आणि विज्ञान, सेंद्रिय शेती, रासायनिक औषधांचा आरोग्यावर परिणाम या विषयावर व्याख्याने सादर केली. शिबिरामध्ये लायन्स हॉस्पिटल, कोडोली यांच्यावतीने नेत्रतपासणी संपन्न झाली. महिला मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन फेरी, ग्रंथदिंडीचे ही यानिमित्ताने आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्राजक्ता आहुजा, डॉ. प्रभा साळुंखे, प्रा.आर. बी. बसनाईक यांच्यासह काखे गावातील विविध सेवाभावी संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था, बचत गट, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, तरुण मंडळे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य दिले. शिबिराचा उद्घाटन आणि समारोप समारंभ काखे गावचे सरपंच दगडू पाटील, उपसरपंच संदीप पाटील, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रम अधिकारी डॉ. सी. आर. जाधव, डॉ.आर.पी.कावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सिद्धीक देसाई व स्वयंसेविका म्हणून कु. सोनाली माने या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला.
178
previous post
वारणा साखरचे संचालक आनंदराव पाटील यांचे निधन
next post