कोल्हापूर

संतोष भोपळे पी. एच. डी पदवी प्रदान

by संपादक

कोरे अभियांत्रिकीचे संतोष भोपळे पी. एच. डी पदवी प्रदान
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक संतोष दत्तात्रय भोपळे यांना व्ही.टी. यु. बेळगावी या विद्यापीठाची पी.एच.डी प्राप्त झाली आहे.संतोष भोपळे हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील ज्येष्ठ आणि अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी वायरलेस कम्युनिकेशन या डोमेन मध्ये “*इनहांसमेंट इन राऊटरस फॉर नेक्स्ट जनरेशन नेटवर्क (एन जी ओ)बेस्ड ऑन क्यू ओ एस*” या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना डॉ. सौ. स्वाती संकपाळ आणि डॉ. डी जयदेव्वाप्पा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन डॉ. विनयरावजी कोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला कोरे यांनी दिला. यासाठी त्यांना प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम , प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, विभागप्रमुख प्रा. सी. पी. शिंदे ,रजिस्ट्रार डी. एस.ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.

You may also like

Leave a Comment