मुंबई बाजार समितीत महाविकास आघाडीची निर्विवाद ‘सत्ता’,भाजपला ‘भोपळा’

by Admin

मुंबई बाजार समितीत महाविकास आघाडीची निर्विवाद ‘सत्ता’,भाजपला ‘भोपळा’
नवी मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील बाजारसमित्यांची शिखऱ संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. या निवडणूकीत भाजपला खातंही खोलता आलेले नाही. ६ महसूल आणि ४ व्यापारी मतदारसंघात भाजपला एकही विजय न मिळाल्याने महाविकासआघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं आहे. राज्यातला महाविकासआघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते.
या निवडणूकीत १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. राज्यातील १०५ कृषी उत्पन्न बाजार समितीची शिखर संस्था असल्याने ही महत्त्वाची निवडणूक होती. मुंबई एपीएमसी संचालक मंडळ २०१३ ला बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने एपीएमसीचा गाडा हाकला होता.
महसूल विभाग विजयी उमेदवार अमरावती : 1.प्रवीण देशमुख ( महाविकास आघाडी) 2. माधवराव जाधव ( महाविकास आघाडी) कोकण विभाग : 3. प्रभु पाटील (अपक्ष) 4. राजेंद्र पाटील (महाविकास आघाडी) पुणे विभाग : 5. बाळासाहेब सोरस्कर ( महाविकास आघाडी) 6. धनंजय वाडकर ( महाविकास आघाडी) नागपूर विभाग : 7.हुकूमचंद आमधरे (महाविकास आघाडी) 8.सुधीर कोठारी ( महाविकास आघाडी) नाशिक विभाग : 9.जयदत्त होळकर ( महाविकास आघाडी ) 10.अद्वैत हिरे ( अपक्ष) औरंगाबाद : 11. वैजनाथ शिंदे ( महाविकास आघाडी) 12. अशोक डक ( महाविकास आघाडी ) व्यापारी विभाग विजयी 13. कांदा बटाटा मार्केट : अशोक वाळुंज (महाविकास आघाडी) 14. भाजीपाला मार्केट : शंकर पिंगळे (अपक्ष ) 15. दाणा मार्केट : निलेश विरा ( अपक्ष) 16. मसाला मार्केट : विजय भुता (अपक्ष ) 17. माथाडी मतदार संघ : शशिकांत शिंदे ( महाविकास आघाडी) 18. फळ मार्केट : संजय पानसरे – बिनविरोध (महाविकास आघाडी )
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६ महसुल आणि ४ व्यापारी अशा एकूण १० मतदारसंघाची निवडणूक शनिवारी (२९ फेब्रुवारी) पार पडली होती. यात एकूण ९३.७२ टक्के मतदान झालं. या निवडणुकीमध्ये एकूण ५८ उमेदवार रिंगणात होते. ६ महसूल विभागात एकूण ३९२८ मतदारांपैकी ३८७८ मतदारांनी मतदान केलं.


You may also like

Leave a Comment