कोल्हापूर

जीवनात दृढनिश्चय, कठोर परिश्रम, स्वतःची कुवत आणि आवड ओळखून यशाच्या शिखरावर पोहोचा- शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पाटील

by संपादक

जीवनात दृढनिश्चय, कठोर परिश्रम, स्वतःची कुवत आणि आवड ओळखून यशाच्या शिखरावर पोहोचा- शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पाटील
वारणानगर (प्रतिनिधि) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित विविध शिक्षण संस्थाचा दुसरा पदवीदान (ग्रॅज्युएट सेरीमनी) समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्‍ठाता प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.एम. गुरव, विशेष कक्षाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. सुरेखा शहापुरे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.व्ही. आणेकर, तात्यासाहेब कोरे औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोजा आणि तात्यासाहेब कोरे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.जी. पाटील यांनी उपस्थित स्नातकांना पदवी बद्दलचा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या. स्वागत प्रास्ताविकात डॉ. वासंती रासम यांनी गत वर्षात संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी स्पर्धा परीक्षेतील यश याच बरोबर शिक्षण, समाज, सेवा क्षेत्रातील कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून महाविद्यालयांनी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा सादर केला. प्रमुख पाहुणे नामवंत शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पाटील म्हणाले की,” वारणानगर सहकारातील पंढरी आहे. तात्यासाहेब कोरे यांनी गरजू ,गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी उच्च शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे. जीवनात दृढनिश्चय, कठोर परिश्रम, स्वतःची कुवत आणि आवड ओळखून यशाच्या शिखरावर पोहोचा असे आवाहन केले. स्वतः मध्ये असणारे कौशल्य विकसित करून सकारात्मक दृष्टीकोन, सूक्ष्म निरीक्षण, अहोरात्र कष्टातून यशाचा नवीन मार्ग शोधन्याचा सल्ला त्यांनी स्नातकांना दिला. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी नम्र आणि आज्ञाधारक असल्याने देशभरात त्यांची एक वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. यशोशिखरावर पोहोचण्यासाठी गैरमार्गाचा शोध घेऊ नका असा सल्ला गुरव यांनी पदवी धारक स्पर्धेच्या जगात टिकले पाहिजेत त्यासाठी नाविण्याचा ध्यास घेण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. जीवन जगण्याचे प्रमाणपत्र म्हणजे पदवी असून पदवीधरांनी दुसऱ्यांच्या आश्चर्याची अपेक्षा ठेवू नये. ध्येयपूर्ती, ध्येयवेडापणा आणि आव्हाने स्वीकारल्याशिवाय तरुणांना यशा सांगितले. आव्हाने स्वीकारल्याशिवाय तरुणांच्यातील कौशल्य विकसित होत नाहीत असेही ते म्हणाले. विशेष कक्षाचे डॉ. प्रमोद पांडव यांनी पदवीनंतर विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असल्याचे सांगून ध्येयाने वेडे झालेले लोकच काही नवीन करू शकतात असे सांगितले. समाजात वावरताना सुसंस्कृत वर्तन ठेवून आपले वेगळे स्थान निर्माण करा. नोकरी मिळवणारे नाही तर नोकरी देणारे व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान सकाळी शेतकरी भवना समोरील सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे शिल्पाकृती पुतळ्यापासून ग्रंथ दिंडी पालखी महोत्सव सुरू झाला. प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी पालखीचे पूजन केले. मोहरे येथील आदिनाथ नलवडे आणि सहकारी यांच्या वारकरी मंडळींनी आणि सर्व संस्थातील विद्यार्थी -विद्यार्थिनी, पालक, स्नातक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडी सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदविला. कारखाना चौकामध्ये दिंडीतील सहभागी सेवकांचा रिंगण सोहळा ही संपन्न झाला. विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्रा जवळ दिंडी चे विसर्जन झाले. “ज्ञानदंड”, घेऊन स्नातक आणि उपस्थित मान्यवरांच्या मिरवणुकीने समारंभाचा शुभारंभ झाला. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक डॉ. वासंती रासम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन डॉ. मार्क मोनिस आणि डॉ. प्रीती शिंदे -पाटील यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी मानले. समारंभात ६०० हून अधिक स्नातकांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. श्री वारणा बाल वाद्यवृंद च्या विद्यार्थिनींनी समारंभ शुभारंभप्रसंगी पसायदान गायिले आणि अखेर राष्ट्रगीताने समारोप संपन्न झाला.


You may also like

Leave a Comment