कोल्हापूर

रोटरी ग्रामसेवा केंद्राचे काम कौतुकास्पद- सौ.गीतादेवी पाटील सभापती पंचायत समिती पन्हाळा

by संपादक

रोटरी ग्रामसेवा केंद्राचे काम कौतुकास्पद – सभापती सौ.गीतादेवी पाटील
कोडोली (प्रतिनिधी)रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर समाजातील सामान्य घटकांसाठी करित असलेले सामाजिक काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती सौ. गीतादेवी पाटील यांनी केले.रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरच्या वतीने आरोग्य वर्धिनी केखले येथे महिला दिना निमित्त अंगणवाडी सेविका ,मदतनीस,आशा स्वयंसेविका व परिसरातील महिलायांच्या साठी आयोजित रक्तातील कॅन्सर व शुगर तपासणी व त्वचारोग निदान शिबीराच्या शुभारंभावेळी त्या बोलत होत्या . आरोग्यवर्धिनी केखलेचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस .बी पाटील यांच्या रोटरी ग्रामसेवा केंद्राने समाजाचे आरोग्य जपणाऱ्या महिलांसाठी शिबीर आयोजित करून महिला दिनाची त्यांना चांगली भेट दिली असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईझचे सदस्य व रोटरी ग्रामसेवा केंद्राचे मार्गदर्शक विशाल जाधव यांनी रोटरी समाजासाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली.डॉ. वैशाली पावसे यांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले . यावेळी रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या वतीने चष्मे आणि कृत्रिम हातांचे वाटप करण्यात आले. बाबासो माने यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रोटरी ग्रामसेवा केंद्राचे अध्यक्ष प्रवीण पाटील ,सचिव विशाल बुगले ,खजिनदार प्रवीण बजागे ,सदस्य डॉ सतीश पाटील ,डॉ अमित सूर्यवंशी,डॉ शामप्रसाद पावसे ,रसिका डोईजड ,अमोल पाटील ,सचिन पाटील ,प्रकाश सूर्यवंशी,सुनील पोवार ,कृष्णात जमदाडे ,प्रमोद कावळे,पराग गोडबोले हे उपस्थित होते. या उपक्रमाचा ८७ महिलांनी लाभ घेतला.डॉ सतीश पाटील यांनी रक्त तपासणी तर डॉ वैशाली पावसे यांनी त्वचारोग तपासणी केली .या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भरत बोराटे ,रणजीत कांबळे ,प्रियांका बुगले ,ज्योती पोवार व केखले आरोग्यवर्धिनीचे अधिकारी, व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




You may also like

Leave a Comment