कोल्हापूर

रस्त्यावर येणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई-जिल्हाधिकारी दौलत देसाई

by संपादक

रस्त्यावर येणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई-जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर (प्रतिनिधी) उद्यापासून रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक खासगी वाहनांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायंकाळी दिला. कालच्या रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूतनंतर आज दुचाकी, चारचाकी घेऊन लोक मोठ्या प्रमाणावर आज रस्त्यावर आली. याचा विचार करुन शासनाने खासगी वाहने रस्त्यावर येणार नाहीत. असा निर्णय घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, उद्यापासून कुठलेही खासगी वाहन रस्त्यावर आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. हे आदेश 31 मार्च पर्यंत लागू राहतील. जिल्ह्याच्या प्रत्येक सिमेवर तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत. या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते. ज्यांना सी. पी. आर मध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्याची आवश्यकता असते त्यांना सी. पी. आरला पाठविले जाते. बाकीच्यांना घरामध्ये अलगीकरण कक्षात राहण्यास बंधनकारक केले जाते. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 14 दिवस ठेवले जाईल. उद्यापासून बाहेरुन कोणालाही जिल्ह्यात घेतले जाणार नाही अथवा अनावश्यक जिल्ह्यातून बाहेर सोडले जाणार नाही. याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. जीवनाश्यक सेवा सुरु राहतील, असेही ते म्हणाले.

You may also like

Leave a Comment