तक्रार निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाच WhatsApp क्रमांक कार्यान्वित नागरिकांनी समस्यांबाबत केवळ संदेश पाठवावेत.-पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर (प्रतिनिधी)-कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाच WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर केवळ तक्रारी, प्रश्न या संदर्भात संदेश पाठवावेत. त्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. जिल्हयात येणा-या अडी अडचणी, तक्रारी प्रश्न संदर्मात जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन बांगर हे या नियंत्रण कक्षाचे प्रमुख आहेत. या कक्षामध्ये 9356716563, 9356732728, 9356713330, 9356750039 व 9356716300 हे WhatsApp क्रमांक आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर समस्यांबाबत केवळ संदेश पाठवावेत. यामध्ये नाव,मोबाईल क्रमांक, पत्ता आणि तक्रारीचे स्वरुप असा उल्लेख असावा. खोटी माहिती अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याशिवाय प्रत्यक्ष संपर्कासाठी 1007 आणि 0231-2659232 हे क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.