कोल्हापूर

होम क्वारंटाइन व्यक्तींनी घराबाहेर पडू नये – सरपंच शंकर पाटील

by संपादक

होम क्वारंटाइन व्यक्तींनी घराबाहेर पडू नये – सरपंच शंकर पाटील उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
कोडोली(प्रतिनिधी)कोडोलीतील होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये जर अशा व्यक्ती घराबाहेर पडल्या तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा कोडोलीचे सरपंच शंकर पाटील यांनी दिला . कोडोली (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोरोना ग्रामसमितीच्या बैठकीवेळी ते बोलत होते यावेळी ग्रामसेवक ए.वाय. कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या सूचनांचे वाचन केले. शंकर पाटील पुढे म्हणाले की की,राज्यात १४४ कलम लागू असल्याने सामान्य नागरिकांनीही ही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. किराणा व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही घरातील एकच व्यक्तीने बाहेर पडावे .या गोष्टीचे उल्लंघन केल्यास सामान्य नागरिकावरही साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यावेळी गावातील किराणा, बेकरी ,औषध दुकानदार यांनी कोणत्याही वस्तूची चढ्या दराने विक्री करू नये ,दुकानाबाहेर चौकोन आखून एका वेळी एकाच व्यक्तीस माल द्यावा. अशा सूचना नोटीस द्वारे देण्यात आल्या. यावेळी तलाठी अनिल पोवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री महेश पाटील,अजित पाटील,अभिजित केकरे तसेच प्रविण जाधव,विलास पाटील, महेश महापुरे,सुनील गजरे,मोहन कुंभार व ग्रामसमितीचे सदस्य उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment