होम क्वारंटाईन बाहेर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

by Admin

होम क्वारंटाईन बाहेर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या 358 मोटार सायकल स्वारावर आणि होम क्वारंटाईन असताना बाहेर आढळलेल्या दोन व्यक्तींवर गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. गोवा व केरळ येथून आलेल्या दोघांचे होम क्वारंटाईन केले असताना देखील ते बाहेर फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर राजारामपुरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुरुंदवाड ता शिरोळ येथील गुरुकृपा परमिट बार हा पुढील बाजूने बंद ठेऊन मागील बाजून कामगाराच्या खोलीतून दारु विक्री होत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या पथकाने कारवाई केली. कारवाई मध्ये 39 हजार 65 रुपये किंमती दारु मिळाल्याने दारु विक्री करणारे सुस्वम विनायक गायकवाड, विशाल संजय तांबट, श्रीमती कांचन विनायक गायकवाड (सर्व राहणार कुरुंदवाड) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना 2020 चे कलम, साथीचे रोग प्रतिबंध कायदा 1897 च्या कलमा नुसार कुरुंदवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी येथे गावठी हातभट्टी विक्री करणारे शांतीलाल गुलाबसिंग भाट (दत्त नगर, इचलकरंजी), गावठी हातभटी दारुसह सापडल्याने इचलकरंजी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये आणि सदरबाजार येथे गावठी हातभट्टी विक्री करणारे दिपक दिलीप माने, (बापू कांबळे गल्ली सदरबाजार) आणि परशूराम विनायक कट्टी (विचारेमाळ) यांच्यार गावठी हातभट्टी दारु विक्रीसह मिळून आल्याने शाहूपूरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर विनाकरण फिरत असणाऱ्या मोटारसायकल धारकावर शहर वाहतूक शाखेने 107 इचलकरंजी शहर वाहतूक शाखा-72, जुना राजवाडा 8, शाहूपुरी 7, करवीर 6, कागल 8, मुरगूड 10, शिरोली एम आयडीसी 28, गांधीनगर 32, गोकूळ शिंरगाव 22, हातकणंगले 6, शिरोळ-14, आजरा 8, गडहिंग्लज 10, नेसरी 20, अशा एकूण 358 केसेस नोंदवल्या आहेत. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आदेशाचे जिल्ह्यातील नागरिकांनी उल्लंघन करु नये, होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

You may also like

Leave a Comment