132
30 मार्चला कोडोली रक्तदान शिबिर
वारणेचा वाघ फौडेशन व कोरोना ग्रामस्थर समिती मार्फत आयोजन
कोडोली (प्रतिनिधी) आज देशावरती कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट आले आहे .या राष्ट्रीय आपत्तीमुळे राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याने सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सांस्कृतीक भवन हौसिंग सोसायटी कोडोली या ठिकाणी वारणेचा वाघ फौडेशन व कोरोना ग्रामस्थर समिती कोडोली यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती वारणेचा वाघ फौडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालय (सी.पी.आर.)रक्तपेढी कोल्हापूर यांच्या वतीने रक्त संकलित केले जाणार असून “”आपले राष्ट्र -आपली जबाबदारी समजून” सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रप्रेम जपावे असे आवाहन या वेळी प्रवीण पाटील यांनी केले.