अॅट्रॉसिटीची धमकी देत जवानाशी हुज्जत घालणाऱ्या ‘शेखर सनदी’वर गुन्हा दाखल
कोल्हापूर(प्रतिनिधी)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असणाऱ्या होमगार्ड जवानाला अॅट्रॉसिटीची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तोतया शेखर सनदी वर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत होमगार्डचे जवान शैलेश माळी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार भादंविस कलम ३५३, ३२३, ५०६ तसेच महाराष्ट्र कोवीड १९ उपाय योजना २०२० चे कलम ११ प्रमाणे सनदी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेखर सनदीचे कारनामे – १९९६-९७ मध्ये लहान मुलांचा डॉक्टर म्हणून जाहिरात देऊन स्टाफ नेमण्याची जाहिरात देऊन फसवणूक आकर्षक पगाराच्या आणि भुलभुलैयाच्या जाहिराती देऊन गरीब, निराधार महिलांची फसवणूक करण्यात अग्रेसर सीपीआर मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना पत्रकार असल्याचे सांगून धमकावतो. बाहेर डॉक्टर असल्याचे सांगतो भीमा कोरेगाव दंगलीनंतर कोल्हापूरातील वातावरण बिघडणवण्यात अग्रेसर असल्याची चर्चा काही पोलिसांनी अनेकदा मार दिला आहे, तर काही पाठिशी घालत असल्याचीही चर्चा शासकीय विश्रामगृहात तब्बल वर्षानुवर्षे तळ ठोकल्याची चर्चा, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रविण दराडे यांनी कारवाई केली. आष्टा पोलिसात यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल जिल्हा परिषदेतही अँट्रासिटीच्या धमक्या देत ठेके मिळवण्याचा प्रयत्न महालक्ष्मी मंदिरातील लाडूच्या ठेक्याशी संबंधित होता. त्यावेळी मुंबईच्या भाविकांना शिळे लाडू दिल्याने ठेका रद्द शाहुपुरी पोलिस स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांशी उध्दट वर्तन करत पेपर मध्ये बातमी छापण्याची धमकी दिली होती. अनेक ठिकाणी वर्तमानपत्राचा संपादक आहे म्हणून सांगून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावून पैसे उकळत असल्याची चर्चा आत्तापर्यंत १०-१२ गुन्हे दाखल तरीही मोकाट, एकदा हद्दपारीची कारवाई कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याकामी पोलिसांना मदत म्हणून होमगार्डच्या जवानांची मदत घेतली जात आहे. गुरूवार (२७ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास होमगार्ड शैलेश माळी हे सदर बाजार येथील मस्जिद चौकाजवळ बंदोबस्तासाठी कार्यरत होते. त्यावेळी शेखर सनदी तोंडाला मास्क न घालता माळी यांच्याजवळ आला. त्यावेळी सनदी याने होमगार्डला ड्युटी लावलेली नाही, लोकांना घरी बसा म्हणून सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार नाही, तसेच तुम्ही लोकांना दमदाटी करु नका अशी उद्धट भाषा वापरत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर सनदीने मी एका पेपरचा संपादक असून आपण सदर बाजार येथेच राहत असल्याचे माळी यांना सांगितले. मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे असे सांगत आपल्याजवळ असणाऱ्या मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग केले. त्यानंतर तुम्ही कशी ड्युटी करता हे दाखवण्यासाठी तुमचे शुटींग करुन एस.पी व डी.वाय.एस.पी यांना पाठवतो असे म्हणत अरे तुरेची भाषा वापरली. बोट करुन तुम्ही येथुन निघून जावा, नाहीतर मी सांगितले नाही अशा पद्धतीची भाषा वापरली. त्याशिवाय सनदी याने जवान माळी यांना धक्का देत तुमच्यावर अॅट्रॉसिटीची तक्रार करतो अशी धमकीही दिली होती.
78