वारणेचा वाघ फौंडेशन व कोरोना ग्रामस्थर समिती,कोडोली आयोजित रक्तदान शिबिरात १०५ जणांचे रक्तदान
कोडोली (प्रतिनिधी) देशावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक रक्तपेढ्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे पाहून वारणेचा वाघ फौडेशन व कोरोना ग्रामस्थर समिती कोडोली यांचे वतीने सोमवार दिनांक ३० मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राज्य शासनाच्या योग्य त्या सूचनांचे पालन करून सकाळी नऊ वाजता सांस्कृतीक भवन ,हौसिंग सोसायटी कोडोली याठिकाणी रक्तदान शिबिरास सुरुवात झाली .रक्तदान करण्यास आलेल्या प्रत्येक रक्तदात्यास हँडवॉश, सॅनिटायझर देऊन हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. हॉल मध्ये प्रत्येक रक्तदात्यास दोन मीटर अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास मास्क देण्यात आला . रक्तदान शिबिर घेण्यापूर्वी संपूर्ण हॉल निर्जंतुक करून घेण्यात आला होता.
रक्तदान शिबिरास महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.शिबिरास माजी अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमरसिंह पाटील ,माजी समाजकल्याण सभापती व जि .प. सदस्य विशाल महापुरे, कोडोलीचे सरपंच शंकर पाटील, कोडोलीचे तलाठी अनिल पोवार ,कोडोली नागरी पतसंस्थेचे चेअरमन धीरज पाटील ,वसंतराव चौगुले पतसंस्थेचे वसंतराव चव्हाण ,हौसिंग सोसायटीचे संचालक नरेंद्र पाटील, विजय उद्योग समूहाचे संस्थापक पी.डी. पाटील , रोटरीचे विशाल जाधव ,प्रवीण जाधव यांच्यासह वारणा परिसर रोटरीच्या सदस्यांनी भेट दिली . वारणेचा वाघ फौडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी उपस्थित सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले जिल्हा शासकीय रुग्णालय सीपीआर कोल्हापूर यांचे वतीने रक्त संकलित करण्यात आले. शिबिरास कोडोली नागरी पतसंस्थेच्या वतीने सॅनिटायझर, सुरेश माळकर यांचेकडून हॅन्ड वॉश , वंसतराव चौगुले पतसंस्थेकडून अल्पोपहार , नवमहाराष्ट्र डेकोरेटर्स, वारणानगर याचेकडून कुलर तर घुंगुरे डेकोरेटर्स,कोडोली याचेकडून फॅन मोफत पुरविण्यात आले. वारणेचा वाघ फौडेशन, गनिमीकावा ग्रूप, सकल मराठा समाज, हौसिंग सोसायटी तरुण मंडळ यांनी शिबिराचे नियोजन केले.
163