रक्तदान करायचय..शिबिरातील गर्दी टाळा..आता फक्त नोंदणी करा.
कोल्हापूर (प्रतिनिधी) ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचय त्यांनी www.kolhapurcollector.com/blooddonation/ या संकेतस्थळावर आता फक्त आपली नोंदणी करावी. आवश्यकतेनुसार नोंदणी झालेल्या दात्यांना बोलविले जाईल जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कोल्हापूर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने www.kolhapurcollector.com/blooddonation/ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अधिकाधिक दात्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या दात्यांना आवश्यकतेनुसार रक्तपेढ्या आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने रक्तदानासाठी कळविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
86