मिरजेतील लॅबमुळे अहवाल मिळणार लवकर – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

by Admin

मिरजेतील लॅबमुळे अहवाल मिळणार लवकर – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूर (प्रतिनिधि) मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून कोरोना बाधीत संशयीतांचे स्वॅब चाचणीची लॅब सुरु झाली आहे. आज कोल्हापूर येथील संशयित 24 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून याचे अहवाल लबकरच मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. कोरोना संशयीत बाधीतांच्या स्वॅब तपासणीसाठी यापुर्वी पुणे येथे पाठविण्यात येत होते. पुणे येथे पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल उशिरा प्राप्त होत होते. मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये स्वॅब चाचणीची सोय झाल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील कोरोना संशयीतांच्या चाचण्या वेगाने होण्यास मदत होणार असल्याचेही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर सांगितले.

You may also like

Leave a Comment