जीवनावश्यक वस्तुंचे दिव्यांगांना घरपोच वाटप करा – जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर (प्रतिनिधि) जीवनावश्यक वस्तुंचे दिव्यांग व्यक्तींना घरपोच वाटप करावे किंवा तात्काळ विना रांग रेशन द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. अंथरुणाला खिळलेल्या तीव्र, अतितीव्र दिव्यांगांना सॅनिटायझर, मास्क, डेटॉल, फिनेल आदी वस्तूही पुरविण्यात याव्यात. गरजू दिव्यांगांना आवश्यकता असेल तेथे स्वयंसेवी संस्थेमार्फत जेवणाची सोय करण्यात येत आहे. राष्ट्रीय बॅंका व इतर बॅंकांमध्ये दिव्यांगांना रांगेत न थांबविता तात्काळ सेवा द्याव्यात. दिव्यांगांच्या शारीरिक दुर्बलतेमुळे त्यांच्यात रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींची काळजी विशेष बाब म्हणून घेण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना देय असणारी पुढील महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स देण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. दिव्यांगांच्या मदतीकरिता तालुकास्तरावर तहसिलदार, गट विकास अधिकारी हे समन्वय म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. याबाबत कोणत्याही दिव्यांगाला अडचणी उदभवल्यास त्यांनी दिव्यांग कल्याण कक्षाशी दूरध्वनी क्र. 0231-2656445, अथवा भ्रमणध्वनी क्र. 8421731677, 7276051472, 9423801262, 9423285864 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
103