*कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याशी व्ही सी व्दारे पालकमंत्र्यांचा संवाद*
कोल्हापूर (प्रतिनिधी)पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्ही डी ओ कॉन्फरन्सींग व्दारे जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याशी संवाद साधत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि इतर प्रश्नांवर चर्चा केली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे आदी सहभागी झाले होते. प्राधान्य गटात नसणाऱ्या केशरी शिधापत्रिका धारकांना रेशन धान्य मिळायला हवे, अशी सूचना आमदार श्री आवाडे, आमदार श्री आवळे यांनी यावेळी केली. खासदार श्री माने यांनीही केसरी कार्डधारकांना अन्न-धान्य मिळण्याची मागणी करुन, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाँक्टरांना पी पी ई कीट मिळावेत आणि खासगी दवाखाने सुरु व्हावेत, असे सांगितले. इंचनाळ ते गजरगाव हा रस्ता ग्रामस्थांसाठी सुरु करण्याची सूचना करुन आमदार राजेश पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना डिझेल-पेट्रोल मिळावे. त्याचबरोबर चंदगडला रुग्णवाहिका मिळायला हवी. पोलीस आणि गृहरक्षक दलांची संख्या कमी पडत असून, ती वाढवून मिळावी. आमदार ऋतुराज पाटील यावेळी म्हणाले, रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षिततेसाठी पीपीई कीट देण्यात यावेत. त्याचबरोबर निर्जंतुकीकरण फवारणी आणि नियमित स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. तसेच सध्याच्या कालावधित बंद असणारे खासगी दवाखाने सुरु ठेवावीत. रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठी सध्या दोन डॉक्टरांसह मतदार संघात ग्रामीणसाठी चार रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. पालकमंत्री श्री. पाटील यांनी या सूचनांचा स्वीकार करुन संबंधितांना निर्देश दिले जातील असे सांगितले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व सूचनांची पूर्तता करण्यात येईल, तसे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आजच देवू , असे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
68