कोल्हापूर

जिल्ह्यातील 14 निवारागृहांमध्ये राज्यातील 203 परराज्यातील 566-जिल्हाधिकारी दौलत देसाई

by संपादक

*जिल्ह्यातील 14 निवारागृहांमध्ये राज्यातील 203 परराज्यातील 566**-जिल्हाधिकारी दौलत देसाई*

*कोल्हापूर (प्रतिनिधी) ** जिल्ह्यातील 14 निवारागृहांमध्ये राज्यातील 203 आणि परराज्यातील 566 अशा एकूण 769 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.*
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 21 परराज्यातील 5 अशा 26 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 16 परराज्यातील 8 अशा 24 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे.
*करवीर तालुका*- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी – राज्यातील 8, परराज्यातील 19 असे एकूण 27 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
*कागल*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील 3 परराज्यातील 97 एकूण 100 जण असून क्षमता 113 जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 3 परराज्यातील 88 असे एकूण 91 जण असून क्षमता 100 जणांची आहे.
*हातकणंगले* -घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 84 जण असून क्षमता 100 जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 107 असे एकूण 109 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 43 परराज्यातील 8 एकूण 51 जण असून क्षमता 55 जणांची आहे. राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील 64 जण असून क्षमता 70 जणांची आहे.
* शिरोळ*- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17 असे एकूण 30 क्षमता 50 आहे.
*गडहिंग्लज*- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 10 परराज्यातील 1 एकूण 11 असून क्षमता 24 जणांची आहे,
*गगनबावडा*- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील 13 जण असून क्षमता 20 जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण 102 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये तामिळनाडूमधील 199, कर्नाटकातील 192, राजस्थानमधील 81, मध्यप्रदेशमधील 54, उत्तर प्रदेशमधील 29,केरळमधील 7, पाँडेचरीमधील 2,पश्चिम बंगालमधील 1, बिहार 1 अशा एकूण 9 राज्यातील 566 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 203 असे मिळून 769 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment