कोल्हापूर

कोरोनाची भीती वाटते..? मिळवा घरबसल्या मोफत मार्गदर्शन

by संपादक

*कोरोनाची भीती वाटते..? मिळवा घरबसल्या मोफत मार्गदर्शन*
*हेल्पलाईन 9555990088; www.**kolhapurcovid19care.com <kolhapurcovid19care.com/>*

* कोल्हापूर(प्रतिनिधी)जिल्ह्यातील नागरिक घरबसल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेबाबत त्वरित व्हीडीओ कन्सल्टेशनद्वारे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवू शकतात. टेलीमेडिसीन या प्रणालीद्वारे 9555990088 या कोविड-19 हेल्पलाईनवर तसेच www.**kolhapurcovid19care.com <kolhapurcovid19care.com/> वर डॉक्टरांशी** संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. *
लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन व मनोरमा इन्फो सोलुशन्स यांच्या संयुक्त सहकार्यातून येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे www.kolhapurcovid19care.com <www.kolhapureovid19care.com/> ही टेलीमेडिसिन सुविधा सुरु केली आहे. *9555990088* हा त्याचा हेल्पलाईन क्रमांक आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरुन मनोरमा इन्फो सोलुशन्सच्या संचालक अश्विनी दानीगोंड यांच्यामार्फत या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नागरिकांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून परदेशवारी, कोरोना लागण, झालेल्या रुग्णांशी आलेला संपर्क तसेच कोरोनाच्या अनुषंगाने सर्व माहिती किंवा सल्ला मागता येईल. यासाठी संपर्क व्यवस्था म्हणून सी. पी. आर मधील दोन हॉस्पिटलमधून तिसऱ्या वर्षाचे व चौथ्या वर्षाचे दहा विद्यार्थी व दहा तांत्रिक सहाय्यक हे सर्व आपापल्या घरातून या साठी काम करतील.
नागरिकाची संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर सीपीआरच्या अधिष्ठातांमार्फत त्यांना संबंधीत डॉक्टरांनी कन्सल्टींगनंतर त्याला टेलीमेडिसीनची गरज आहे की नाही हे निश्चित केले जाईल. त्या विभागातील डॉक्टरांशी वेळ घेऊन संबंधीतांना कळविले जाईल. डॉक्टर नोंदणी झालेल्या क्रमांकावरती ऑडीओ अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांशी संपर्क करतील. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत त्याला SMS सेवेद्वारे कळविले जाईल व मार्गदर्शन केले जाईल. ही संपूर्ण सेवा मोफत असून WHO च्या गाईडलाईन्सला अनुसरुन सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या आपत्तीनंतरही सुविधा निरंतर सुरु राहील. जिल्ह्यातील नागरिकांना घरबसल्या कोरोना आरोग्य सेवेबाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. केडीएमजीच्यावतीने डॉ. शीतल पाटील यांनी डॉक्टर तसेच हेल्पलाईनसाठी वरुण जैन यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स पुरवून सहकार्य केले आहे.

You may also like

Leave a Comment