कोल्हापूर

आमदार रोहित पवार यांच्याकडून जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनीटायझर

by संपादक

आमदार रोहित पवार यांच्याकडून जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनीटायझर
कोल्हापूर(प्रतिनिधी)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंध उपाय म्हणून सॅनीटायझर वाटप करण्यात आले. नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हे सॅनीटायझर आज सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
दालमिया फाऊंडेशनकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयास सॅनिटायझरचा पुरवठा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी सतत रस्त्यावर बाहेर आपले कर्तव्य बजावत असतात तसेच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात असते. सद्यस्थितीमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला काळजी घ्यावी लागते. सतत सॅनीटायझर चा वापर करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन दालमिया फाउंडेशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयास वीस लिटर हॅन्ड सॅनिटायझर भेट देण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने दालमिया फाऊंडेशनचे हार्दिक आभार मानले.


You may also like

Leave a Comment