कोल्हापूर

मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझिटिव्ह

by संपादक

*मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझिटिव्ह*
*कोल्हापूर(प्रतिनिधी) दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील 30 वर्षीय तरुण कोरोना पॉझीटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.*
हा तरुण दिल्ली येथून 14 मार्चरोजी निघून 16 ला कोल्हापुरात पोहोचला येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो आपल्या घरी दि 18 मार्चला घरी परतला.
पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 1 एप्रिलला प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा स्वॉब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला. त्याला आज सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.त्याला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.

You may also like

Leave a Comment