कॉन्टॅक्ट ट्रेसिंगने कित्येकांचं आयुष्य वाचवलं जावू शकते
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखांची पोस्ट व्हायरल
कोल्हापूर (प्रतिनिधी) एक महत्वाची सूचना या नावाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबतची पोस्ट समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात आज व्हायरल झाली.
‘स्टे होम, सेव्ह लाईव्हज्’ अशी सुरुवात असणाऱ्या पोस्टमध्ये प्रत्येकाने काही दिवसाकरिता एक छोटी वही आपल्यासोबत बाळगावी. त्या वहीत आपण दिवसभरात ज्यांच्या-ज्यांच्या संपर्कात आलो त्यांची नावे, कोठे कोठे गेलो त्याची नोंद दिनांकासहित प्रत्येक पानावर लिहा. जेणे करुन जरी आपल्याला कोरोना संसर्ग झालाच, तर प्रशासनाला आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळविण्यास मदत होईल.
यालाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात. ‘‘आपल्या या छोट्याशा सवयीने कित्येकांचं आयुष्य वाचवलं जावू शकते’’ कोरोना व्हायरस थांबवा घरात राहून! आपले आरोग्य जपा सहकार्य करा, असा संदेश दिला आहे.
आमची वर्दी कोरोना प्रतिरोधक नाही, कृपया नियमांचे पालन करा. संपर्कासाठी व्हाटस्ॲप 7218038585 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.
80