*कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये विभागणी; पाहा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये!* मुंबई (प्रतिनिधी) कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन तयार केले आहेत. वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा फोकस आणि उपाययोजना करण्यासाठी तयार केलेले झोन यावरून मदत करणं किंवा चाचण्या करणं प्रशासनाला सोपं जाणार आहे. तसंच प्लॅन एक्सुक्व्युट करायला देखील सोपं जाणार आहे.
ज्या जिल्हांमध्ये 15 पेक्षा अधिक रूग्ण असतील ते जिल्हे रेड झोनमध्ये असतील. 15 पेक्षा कमी कोरोनाबाधितांचा समावेळ ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाहीये, असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.
*रेड झोन जिल्हे–* मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद
*ऑरेंज झोन जिल्हे*- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि गोदिंया
*ग्रीन झोन-* धुळे, नंदुरबार, परभणी, सोलापूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भांडारा आणि गडचिरोली
previous post
1 comment
छान