कोल्हापूर

शासनाचे बोगस ओळखपत्र तयार करुन फिरणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

by संपादक

शासनाचे बोगस ओळखपत्र तयार करुन फिरणाऱ्या गजानन पाटीलवर गोकूळ शिरगाव पोलीसांची कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाचा फलक तसेच महाराष्ट्र शासनाचे बोगस ओळखपत्र तयार करुन तोतया लिपिक गजानन रवींद्र पाटील (वय 33, रा. कणेरी, ता. करवीर) याला गोकूळ शिरगाव पोलीसांनी अटक करुन आज कारवाई केली. दिनांक ११ एप्रिल रोजी कणेरीवाडी फाटयावर नाकाबंदी करीता नाकाबंदी सुरु असताना गोकूळ शिरगांव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती इनोव्हा गाडीला महाराष्ट्र शासनाचे बनावट प्लेट लावून फिरत आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कणेरीवाडी गावाच्या दिशेकडून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी (क्र. एम एच ५० एम ७८६०) ही आली असता तीला बंधोबस्तावरील पोलीस पथकाने थांबवीले. या गाडीच्या समोरील काचेच्या आतील बाजूस पांढऱ्या फलकावर लाल अक्षरात महाराष्ट्र शासन व मध्यभागी अशोक स्तंभ मुद्रा दिसून आली. याबाबत गाडी चालकाकडे चौकशी केली असता, त्यांने आपल्या गळयातील महाराष्ट्र शासनाचे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडील ओळखपत्र दाखवून आपले नाव गजानन रवींद्र पाटील असे सांगून महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे लिपिक पदावर नोकरीस असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्यांने प्रथमत: उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. ठाण्यामध्ये सपोनि श्री. चव्हाण यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर तसेच उपजिल्हाधिकारी सजंय शिंदे यांना त्यांच्या व्हॉटसअपवर गजानन रवींद्र पाटील याचे ओळखपत्र पाठवून चौकशी केली. गजानन रवींद्र पाटील यास ओळखत नसून या नावाची व्यक्ती आमच्या कार्यालयाकडे नेमणुकीस नाही, असे त्यांनी सांगितले. गजानन रवींद्र पाटील याच्याकडे अधिक चौकशी करता त्यांने आपण शासकीय नोकरीस नसून हे ओळखपत्र व महाराष्ट्र शासन बोर्ड हा बोगस लावून फिरत असल्याची कबुली दिली. गजानन रवींद्र पाटील यांने महाराष्ट्र शासनाचा बोर्ड तसेच महाराष्ट्र शासनाचे बोगस ओळखपत्र तयार करुन तोतयेगिरी करुन शासनाची फसवणूक केली आहे. तसेच सध्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य विषाणुच्या अनुषंगाने संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेला आहे. संचारबंदी असताना त्याचे उल्लघंन करून विनाकारण इनोव्हा गाडीतून वाहन. चालविण्याचा परवाना नसताना तसेच सिटबेल्ट न लावता फिरुन संसर्ग पसरण्याची घातक कृती करुन फिरत असताना मिळून आला आहे. त्याच्याविरुध्द सुहास मधुकर संकपाळ पोलीस नाईक यांनी भा.द.वि.स १७१,१८८,२६९ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ व महाराष्ट्र COVID-१९ विनियमन २०२० कलम ११ प्रमाणे व साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील खंड २.२.४ व एम व्ही अक्ट कलम १८१, १३८/१७७ प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिली. आरोपी गजानन पाटील यांस अटक करुन इनोव्हा गाडी, बोगस ओळखपत्र,महाराष्ट्र शासन असे लिहलेली पाटी जप्त करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. चव्हाण यांनी केली आहे. याचा तपास सहायक फौजदार दिलीप तिखडे व कॉन्टेबल उदय कांबळे हे करीत आहेत.

You may also like

Leave a Comment