कोल्हापूर

पोलिसांच्या आरोग्यासाठी स्पिंकलर सॅनेटायझर चेंबर

by संपादक

पोलिसांच्या आरोग्यासाठी स्पिंकलर सॅनेटायझर चेंबर
कोडोली(प्रतिनिधी) येथील पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या आरोग्यासाठी आज सॅनेटायझर स्पिंकलर चेंबर बसवण्यात आले. याचे उद्घाटन कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्या हस्ते झाले.
कै.विलासराव कोरे फौंडेशनचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते निवास पाटील, सरदार पाटील यांच्या प्रयत्नातून हे सॅनेटायझर चेंबर बसविण्यात आले.पोलीस हे अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना सॅनेटायझर चेंबरची नितांत आवश्यकता होती कारण कोरोनाव्हायरस कपड्यावर सहा तासापर्यंत जिवंत राहू शकतो . सॅनेटायझर चेंबर मुळे संपूर्ण शरीरावर सॅनिटायझरची मात्रा पसरते आणि ९० टक्के पर्यंत कोरोनाव्हायरस निर्जंतुकीकरण होत. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने पोलीस दिवसभर अहोरात्र जिवाची कसलीही परवा न करता कोरोनासंदर्भात लोकांना संदेश देत आहेत ,याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्हाला जोडणारे दोन‌ महत्वाचे मार्ग कोडोलीतून जात असल्याने या मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते .यासाठी पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी हे स्पिंकलर सॅनेटायझर चेंबर बसविण्यात आले .
यावेळी दिपक जाधव, डाॅ.अभिजित जाधव, एच.आर.कुंभार, विनायक पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment