कोरोना विषाणूसंदर्भात काही गैरसमजुती
१. **असत्य** : हा विषाणू जूना असून याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. **सत्य** : नाही. करोना विषाणूगटाच्या आधीच्या विषाणूंबद्दल माहिती उपलब्ध आहे, पण नोवल करोना हा नवीन विषाणू आहे. त्याबद्दलची माहिती रोज नव्याने समोर येते आहे.
२. **असत्य** : नोवल करोना विषाणू उष्ण आणि दमट टिकत नाही. **सत्य** : आतापर्यंतच्या संशोधनानुसार नोवल करोना विषाणूचा संसर्ग सर्व वातावरणांत/हवामानांत (उष्ण, दमट) होऊ शकतो. हवामानाचा विचार न करता, आपण राहत असलेल्या व प्रवास करत असलेल्या ठिकाणी COVID-19 पासून वाचण्याच्या उपायांचा अवलंब करा.
३. **असत्य** : आपल्या अंगावर अल्कोहोल किंवा क्लोरीनची फवारणी केल्यास आपण नोवल करोना विषाणूपासून सुरक्षित राहतो. **सत्य** : नाही. लागण झालेल्या रुग्णांनी आपल्या अंगवार मद्य अथवा क्लोरीनची फवारणी केल्यास ते सुरक्षित होऊ शकत नाहीत. किंबहूना अशा गोष्टींची फवारणी ही कपड्यांसाठी व शरीरासाठी (जसे की डोळे, तोंड) घातक असते. सावध रहा, अल्कोहोल आणि क्लोरीनची फवारणी ही जरी निर्जंतुकीकरणासाठी वापरली जात असली तरी त्याचा योग्य वापर हा देखरेखेखाली करणे आवश्यक असते आणि शरीरावर केल्यास इजा होऊ शकते.
४- **असत्य** : अँटीबायोटिक्स औषधे COVID-19 च्या उपचारांसाठी वापरली जातात. **सत्य** : नाही. अँटीबायोटिक्स औषधे केवळ जिवाणूंच्या ससंर्गाविरुद्ध लढण्यासाठी वापरली जातात. COVID-19 हे व्हायरल इन्फेक्शन असून ऍन्टीबायोटिक्स औषधांनी ते बरे होऊ शकत नाही.
५- **असत्य** : भारतामध्ये COVID-19 वरील औषध सापडले आहे. **सत्य** : नाही. अजूनपर्यंत असा कोणताही वैज्ञानिक पुरावा सिद्ध झालेला नाही.
६- **असत्य** : न्युमोनियासाठी वापरात येणारी लस ही नोवल करोनाचा संसर्ग रोखते. **सत्य** : नाही. न्युमोनियाला रोखाणारी लस नोवल करोना विषाणूपासून संरक्षण देत नाही. हा विषाणू नवा आणि वेगळा आहे आणि त्याला रोखण्यासाठी विशेष लसच गरजेची आहे. संशोधक 2019-nCoV विरोधात संरक्षण देणार्या लसीचे संशोधन करत असून डब्ल्युएचओ (WHO) त्यांना सहकार्य देत आहे.
84