महाराष्ट्र

कोरोना विषाणू संदर्भात गैरसमज(भाग-२)

by संपादक

कोरोना विषाणू संदर्भात गैरसमज
१.*असत्य* : गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतरही COVID-19 चा धोका कमी होतो. *सत्य* : गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतरही COVID-19 चा धोका कमी होत नाही. आंघोळीनंतरही तुमच्या शरीराचे तापमान हे बदलत नाही ते ३६.५° से. ते ३७° से इतकेच राहते. किंबहूना कडकडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यास ते शरीरासाठी घातक असते त्याने शरीर भाजण्याची शक्यता असते.
२. *असत्य* : हॅण्ड ड्रायर्स हे नॉवल करोना विषाणूंचा नाश करण्यासाठी उत्तम असतात. *सत्य* : नाही. हॅण्ड ड्रायर्स हे नॉवल करोना विषाणूंचा नाश करु शकत नाहीत.
३. *असत्य* : अल्ट्राव्हायोलेट निर्जंतुकीकरण दिवे नॉवेल करोना विषाणूंचा नाश करतात. *सत्य* : हात किंवा त्वचेच्या इतर भागांच्या निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्राव्हायोलेट दिवे वापरु नये कारण यातून बाहेर पडणारी अतिनील किरणे त्वचेला इजा पोहोचवू शकतात.
४. *असत्य* : नियमितपणे तुमचे नाक सलाईनने स्वच्छ केल्यास नॉवल करोना विषाणूचा संसर्ग रोखला जाऊ शकतो. *सत्य* : नाही. नियमितपणे नाक सलाईनने स्वच्छ केल्यास नोवल करोना विषाणूच्या प्रादुर्वाभावापासून लोकांना सुरक्षितता मिळते असता कोणताही वैद्यकीय पुरावा प्राप्त झालेला नाही.
५. *असत्य* : लसूण खाल्ल्याने नवीन करोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध होऊ शकतो. *सत्य* : लसूण हे पौष्टिक अन्नपदार्थांच्या यादीतील असून यात काही प्रतिजैविक गुणधर्म आढळू शकतात. पण लसूण खाल्ल्याने नॉवल करोना विषाणूपासून लोकांना संरक्षण मिळाले आहे असा अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही.
६. *असत्य* : मास्क हे संपूर्ण वेळ घालावेत. *सत्य* : शासनाच्या आदेशानुसार निरोगी व्यक्तींनी मास्क घालण्याची गरज नाही. ज्या व्यक्तींना तापाची लक्षणे आहेत जसे की खोकला, सर्दी इ. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा व्यावसायिक आणि जे रुग्णांची सेवा करत आहेत अशांनीच मास्क वापरणे गरजेचे आहे. निरोगी व्यक्तींनी मास्क वापरल्याने सुरक्षिततेचा खोटा दिलासा मिळतो आणि त्याचा चुकीचा वापर उलट हानीही पोहोचवू शकतो. मास्कचा वापर हा योग्य प्रकारे वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांना खरोखरच गरज आहे अशा व्यक्तींनीच मास्कचा वापर करावा. मास्क वापरण्याची आणखी माहिती ही जागरुकता मोहीमेतून मिळू शकेल.
७. *असत्य* : लसूण खाल्ल्याने नवीन करोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध होऊ शकतो. *सत्य* : लसूण हे पौष्टिक अन्नपदार्थांच्या यादीतील असून यात काही प्रतिजैविक गुणधर्म आढळू शकतात. पण लसूण खाल्ल्याने नॉवल करोना विषाणूपासून लोकांना संरक्षण मिळाले आहे असा अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही.
COVID-19 बाबत अधिक व अद्ययावत माहिती तपासण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील COVID-19 विभागाला भेट द्या:

You may also like

Leave a Comment