कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउन काळात म्हणजे ३ मे २०२० पर्यंत सर्व प्रवासी रेल्वे सेवा रद्द
१४ एप्रिल २०२० नवी दिल्ली(प्रतिनिधी) कोविड-19 लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल,कोकण रेल्वे इत्यादी भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा ३ मे २०२० पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मालवाहू गाड्यांची सेवा सुरळीत ठेवण्यात आली आहे. इ तिकीट सह कोणत्याही प्रकारच्या तिकिटाचे आरक्षण पुढील आदेशापर्यंत करता येणार नाही. तथापि आरक्षित तिकिटे ऑनलाईन रद्द करण्याची सुविधा सुरु राहील.
यूटीएस आणि पीआरएस सह सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी पुढील आदेशापर्यंत तिकिट काउंटर बंद राहणार आहेत.
रद्द केलेल्या गाड्यांच्या आरक्षणासाठीचा संपूर्ण परतावा मिळणार आहे.
अद्याप रद्द न झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणाऱ्यांना पूर्ण परतावा मिळणार आहे.
३ मे २०२० पर्यंत प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी आरक्षित तिकिटांचा परतावा रेल्वेकडून ग्राहकांना ऑनलाईन वर्ग करण्यात येईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून आरक्षण केले आहे त्यांना तिकीट खिडकीवरून ३१ जुलै २०२० पर्यंत परतावा मिळू शकेल.
83
previous post