कोविड19 नमुना चाचण्यांसाठी डीआरडीओ ने कियोस्क म्हणजे लहान कक्ष विकसित केले
दि.१४ एप्रिल २०२०
नवी दिल्ली (प्रतिनिधी) डीआरडीओ च्या अंतर्गत येणारी हैदराबाद येथील, संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, म्हणजेच डीआरडीएल ने कोविड19 च्या रुग्णांच्या नमुना चाचण्या करण्यासाठी नमुना संकलन कक्ष (COVSACK) विकसित केले आहेत. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या डॉक्टरांच्या सहायाने हे कक्ष विकसित करण्यात आले आहेत. यात कोरोना संशयित रुग्णांचे स्वैब नमुने चाचणीसाठी संकलित केले जाऊ शकतील.
हे कियोस्क म्हणजेच कक्ष स्वच्छ करण्यासाठी मानवी मदतीची गरज नाही. ते आपोआप निर्जंतुक केले जाऊ शकतात. या कक्षांवर असलेले कव्हर नमुने चाचणी घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्याचे संरक्षण करते,ज्यामुळे, संशयित रूग्णाच्या नमुन्याचे तुषार किंवा कण त्यांच्या शरीरावर पडले तरीही, त्यांना संसर्ग होत नाही. यामुळे PPE सूट्स ची गरज भासत नाही.
रुग्ण या कक्षातून बाहेर पडल्यावर, चार नोझल्समधून निर्जंतुक द्रव्याचा फवारा ७० सेकंदांसाठी कक्षात केला जातो.त्यानंतर पाणी आणिअतिनील किरणांद्वारे त्याला अधिक निर्जंतुक केले जाते. त्यानंतर ही व्यवस्था पुढच्या रुग्णाचे नमुने घेण्यासाठी तयार होते.या प्रक्रियेसाठी केवळ दोन मिनिटे वेळ लागतो. या कक्षात, दोन्ही बाजूंनी बोलण्याची व्यवस्था असल्याने, वैद्यकीय अधिकारी दोन्ही बाजूंनी त्याचा वापर करु शकतात.
या कक्षासाठी साधारण एक लाख खर्च रुपये असून बेळगावचा एक उद्योग एका दिवशी १० कक्ष तयार करु शकतो. सध्या DRDO ने असे दोन कक्ष तयार केले असून ते हैदराबाद च्या ESIC रुग्णालयाला दिले आहेत.
75