कोल्हापूर

बेकायदेशीररित्या विक्रीस आलेला २१ टन ५०० किलो रेशनच्या तांदळाचा ट्रक जप्त

by संपादक

बेकायदेशीररित्या विक्रीस आलेला २१ टन ५०० किलो रेशनच्या तांदळाचा ट्रक जप्त दि.१५एप्रिल २०२० कोल्हापूर(प्रतिनिधी) बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हुक्केरी येथून २५ किलो वजनाची ८६० पोती असा एकूण २१ टन ५०० किलो रेशनचा तांदूळ बेकायदेशीररित्या विक्रीस घेवून आलेला ट्रक (क्र. केए-२३ए-८९९८) अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी जप्त केला. जिल्हा प्रशासनाकडे कमी वजनाचे धान्य देणे, पावती न देणे अशा सर्वसाधारण स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या तक्रारीनुसार कोल्हापूर शहरातील जनरल कंझ्युमर्स यांची दोन स्वस्त धान्य दुकाने, शिवालय महिला बचत गटाकडील एक दुकान आणि हेदवडे, ता. शाहूवाडी येथील एक दुकान तसेच आजरा तालुक्यातील मुम्मन येथील एक दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना पात्र लाभार्थींना मंजूर केलेल्या नियतनानुसार धान्य वितरीत करावे. धान्य वितरणाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. तक्रार आल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द केला जाईल, असा इशाराही श्री. कवितके यांनी दिला आहे.

You may also like

Leave a Comment