[कोल्हापूर] कोडोली उपजिल्हा रुग्णालयात निर्जतुकीकरण कक्षाची उभारणी
गोकुळ संचालक विश्वासराव जाधव यांचा सामाजीक उपक्रम
दि.१६ एप्रिल २०२० कोडोली (प्रतिनिधी) राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे त्यामुळे कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोकुळ संचालक विश्वासराव जाधव यांच्या वतीने रुग्णालयात निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे .
कोडोली हे पन्हाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून कोडोलीच्या आसपास असणाऱ्या खेड्यांमधील अनेक जण वैद्यकीय सेवेसाठी कोडोली येथे येत असतात .कोडोली उपजिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक सुविधा मोफत उपलब्ध असल्याने या ठिकाणी रुग्णांची नेहमी वर्दळ असते या वर्दळीमुळे कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढू शकतो हे लक्षात घेऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोकुळ संचालक विश्वासराव जाधव यांच्या वतीने रुग्णालयात निर्जंतुकीकरण कक्ष उभारून या सेवेचा प्रारंभ केला .
यावेळी सरपंच शंकर पाटील, वैद्यकीय अधीक्षक श्रीनिवास अभिवंत, अर्बन बँकेचे संचालक विवेक जाधव ,प्रवीण जाधव, जीवन माने ,प्रवीण पाटील, डॉक्टर कोवळे आदी उपस्थित होते.
84
previous post