कोल्हापूर

मास्क न वापरणाऱ्या रेशन दुकानदाराला १५०० तर अन्य दोघांना प्रत्येकी 500 चा दंड

by संपादक

*मास्क न वापरणाऱ्या रेशन दुकानदाराला १५०० **तर अन्य दोघांना प्रत्येकी ५०० चा दंड*
*महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची कारवाई*
*दि.१६ एप्रिल २०२०-*
* कोल्हापूर(प्रतिनिधी)मास्क न वापरणाऱ्या श्री राजारामपुरी ग्राहक सहकारी संस्था लि. संस्थेचे सरकार मान्य रास्तभाव धान्य दुकानदारास दीड हजार रुपयाचा तर अन्य दोघांना प्रत्येकी ५०० रुपयाचा दंड महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केला **.*
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी हे आयसोलेशन रुग्णालयाकडे भेटीसाठी जात असताना उद्यमनगर येथील श्री राजारामपुरी ग्राहक सहकारी संस्था लि. संस्थेचे सरकार मान्य रास्तभाव धान्य दुकानामध्ये दुकानदार रवींद्र आनंदराव पाटील हे विना मास्क त्यांना दिसून आले. या दुकानामध्ये अन्य दोघेही विना मास्क उभे होते.तात्काळ याची दखल घेत आयुक्तांनी प्रत्येकी ५०० या प्रमाणे जागेवर दुकानदाराला दीड हजार रुपयाचा दंड करुन पावती दिली.
आयसोलेशन रुग्णालयाकडून भेट देवून परतत असताना जवाहरनगरमधील सीटी मेडिकोमध्ये विना मास्क खरेदीसाठी आलेले विजय शंकर बुडके यांनाही आयुक्तांनी ५०० रुपये दंड ठोठावला. मोहनदास व्हटकर हे घराबाहेर विना मास्‍क बसले होते त्यांनाही आयुक्तांनी ५०० रुपये दंड ठोठावून पावती दिली.
सर्वांनी सक्तीने मास्क वापरले पाहिजे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भाजी विक्रेत्यांनी मास्कसह हाती मोजेही वापरले पाहिजेत. आज केवळ ५०० रुपये दंडावर भागले आहे. उद्यापासून दंड तर करुच आणि पोलीस गुन्हेही दाखल करु असा इशाराही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिला आहे.

You may also like

Leave a Comment