कोल्हापूर

रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरची गरजूंना मदत .

by संपादक

रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरची गरजूंना मदत .
दि.१७ एप्रिल २०२० वारणानगर (प्रतिनिधी) रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर ही पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने बांबवडे ता. शाहूवाडी येथील दहा गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली आहे. अनेक कुटुंबांना रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बांबवडे येथील डवरी समाजाची सध्या अशीच स्थिती आहे .रोटरी ग्रामसेवा केंद्राला या समाजा बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या वतीने येथील १० कुटुंबांना आटा ,तांदूळ ,डाळ ,तेल ,साखर अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.बांबवडे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक विजय चव्हाण,सहायक फौजदार एम.के.पोवार ,युवा उद्योजक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सदस्य विशाल जाधव,रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे अध्यक्ष प्रवीण पाटील ,सचिव विशाल बुगले,पत्रकार रमेश डोंगरे यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरी ग्रामसेवा केंद्राचे सदस्य प्रवीण बावणे ,जयदीप पाटील व मार्गदर्शक विशाल जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.या मदती बद्दल डवरी समाजाचे अजय चव्हाण यांच्यासह अन्य समाजबांधवांनी रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले .यावेळी ग्रामसेवा केंद्राचे सदस्य कृष्णात जमदाडे व डवरी समाज बांधव उपस्थित होते .



You may also like

Leave a Comment