वारणा बझारच्या वारणानगर शाखेसह पेठवडगांव येथे सॅनिटायझर चेंबर्सचे उदघाटन
दि.१९एप्रिल२०२० कोडोली(प्रतिनिधी)वारणा बझार या ग्राहक संस्थेने आपल्या वारणानगर आणि वडगाव या दोन मुख्य शाखेमध्ये बसविण्यात आलेल्या सँनिटायझर चेंबरचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरीता वारणा बझार संस्थेने सकाळी १०ते दुपारी २ या वेळेत आपली सेवा सुरू ठेवली आहे.माल खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना व कर्मचारी सेवकांच्या निर्जंतुकीकरणाकरीता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणानगर व वडगाव या दोन्ही ठिकाणी सँनिटायझरचे दोन युनिट बसविण्यात आले आहेत.
वारणानगर येथे वारणा बझारच्या आवारात आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते सॅनिटायझर चेंबर्सचे उदघाटन झाले. वडगाव या ठिकाणी वडगाव नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा शिंदे – कोल्हे यांच्या हस्ते उदघाटन झाले .
बझारमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे नियम काटेकोरपणे पाळत ग्राहकांना हँड सँनिटायझर केल्यानंतर व तोंडाला मास्क लावूनच खरेदी करण्यासाठी आत सोडले जात असल्याचे सरव्यवस्थापक शरद महाजन यांनी सांगितले.
यावेळी ज्योतिरादित्य कोरे,उपाध्यक्ष सुभाष देसाई,संचालक अनिल पाटील,पन्हाळा तालुका संपर्कप्रमुख रवींद्र जाधव,सीमा बायोटेकचे विश्वास चव्हाण,दिलीप पाटील, महेश आवटी,संदीप पाटील तानाजी ढेरे,हणमंत दाभाडे, बाळासाहेब कळंत्रे, श्रीधर लंबे, रविराज पाटील आदी उपस्थित होते.
91