राष्ट्रीय

जीवाणूवाहक ओळखण्यासाठी पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने विकसित केले ‘बग स्निफर’

by संपादक

जीवाणूवाहक ओळखण्यासाठी पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने विकसित केले ‘बग स्निफर’
दि.२० एप्रिल २०२० नवी दिल्‍ली (प्रतिनिधी)केंद्रसरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आघारकर संशोधन संस्था, या स्वायत्त संस्थेतील संशोधकांनी वेगाने जिवाणूंचा शोध घेण्यासाठी कमी खर्चाचा सेन्सर बसवलेले संवेदनशील साधन तयार केले आहे. कुठेही नेता येण्यासारख्या या साधनाने 30 मिनिटात 1 मिलीलिटर नमुन्यातुन 10 जिवाणू पेशी ओळखणे शक्य झाले आहे. सध्या या साधनाने एकाच वेळी Escherichia coli आणि Salmonella typhimurium या जीवाणूंना एकाच वेळी शोधून अलग करण्याच्या पध्दतीवरही संशोधन सुरू आहे.
या संशोधनाचे प्रमुख डॉ. धनंजय बोडस ह्यांनी या साधनाला *बग स्निफर* (bug sniffer)असे नाव दिले असून वाजवी किंमतीचा हा सेन्सर असून पाणी आणि अन्नावाटे शिरणाऱ्या जीवाणूंचे अस्तित्व सिंथेटिक पेप्टाईड्स, मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्स आणि क्वांटम डाॅट मधून ओळखू शकतो. संशोधकांनी तांब्याच्या तारांनी आणि पाॅली (डायमिथाईलसायलोक्झेन) यांनी बनलेली सूक्ष्म वाहिन्या असलेली एक चीप बनवली आहे. सध्या रुढ असलेली पारंपरिक जंतू शोधण्याची पध्दत ही कमी संवेदनशील असून कमी संख्येने जीवाणूंचा शोध घेत असून ती वेळखाऊ आहे परंतु ARI ने शोधून काढलेल्या पध्दतीने केवळ 30 मिनिटात 1 मिलीलिटर मधून 10 पेशींचा शोध घेणे, शक्य झाले आहे.
अनेक सर्वसाधारण रोगांचे मूळ असलेले Escherichia coli आणि Salmonella typhimurium हे जंतू एकाच वेळी वैयक्तीकरित्या शोधून काढणे, हे या साधनातल्या सिंथेटिक पेप्टाईड्स मुळे शक्य झाले असून त्यामुळे तपशीलवारपणे जीवाणूचे अस्तित्व सिद्ध करता येते. हे पेप्टाईड्स जीवाणूंचे अस्तित्व करताना दुसऱ्या कोणत्याही ‘क्ष’ पदार्थाशी त्याचा रासायनिक संयोग अत्यंत कमी प्रमाणात होतो.’जर्नल ऑफ बायोटेक्नॉलॉजी’च्या अंकात संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात सुरूवातीला चुंबकीय कणांना पेप्टाईड्स जोडून ते सूक्ष्म वाहिन्यांतून जीवाणूंबरोबर वहात होते,असा उल्लेख केला होता.
बाहेरून चुंबकीय क्षेत्र वापरल्यावर जीवाणू पेप्टाईड्सना चिकटून वेगळे होऊन त्यांची गती थांबली.पेप्टाईड्स ना चिकटलेल्या जीवाणूंना वाहिन्यांमधून पाठवल्यावर सँडविच पेप्टाईड्स अँसे (sandwiched peptide assay) पूर्ण झाला. जीवाणू चिकटल्यानंतर सूक्ष्म वाहिन्या तीव्र स्थीर चमकदार रंगांत चमकू लागल्या.
हा *बग स्निफर* वाजवी किंमतीचा असून त्याला बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल सहजपणे उपलब्ध आहे. प्रमुख संशोधक डॉ. धनंजय बोडस यांच्या मते हा नॅनोसेन्सर आणि त्या संदर्भातल्या संशोधनाने जीवाणूरोगनिदान क्षेत्रात त्वरित परीणाम सांगणाऱ्या आणि चीपद्वारा करता येणाऱ्या चाचण्यांच्या संशोधनाला सुरुवात होणं शक्य झाले आहे.
LAMP( Loop Mediated isothermal amplification) या तंत्रज्ञानाचा वापर करून काही रोगांचे मूळ शोधून काढण्यासाठी एका नळीद्वारे DNA ला मोठे करून Esche richia coli आणि Salmonella typhimurium या जीवाणूंना एकत्र शोधून वेगळे करण्यावर संशोधन सुरू आहे. या संशोधनाला ICMR ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला निधी दिला आहे.

You may also like

Leave a Comment