भारतीय अन्न महामंडळाकडे असलेल्या अतिरिक्त तांदुळापासून इथेनॉल निर्मितीस मंजुरी
दि.२० एप्रिल २०२० नवी दिल्ली(प्रतिनिधी) भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या तांदुळाच्या अतिरिक्त साठ्यापासून इथेनॉलची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर तसेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी याचा उपयोग होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जैविक इंधन समन्वय समितीच्या एक बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जैविक इंधना संबंधी राष्ट्रीय धोरण- २०१८ मधील मसुदा ५.३ नुसार एखादया धान्याचे वार्षिक उत्पादन भरपूर झाल्याने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे त्याचा अतिरिक्त साठा असल्यास, राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीच्या मंजुरीनुसार या अतिरिक्त धान्याचे रूपांतर इथेनॉल मध्ये करण्यास परवानगी आहे.
69
previous post
1 comment
भारतीय अन्न महामंडळ असतं हे मला आज माहित झालं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला ह्या महामंडळाची माहिती असणे आवश्यक आहे ही माहिती हे महामंडळ आहे हे नागरिकांना याची माहिती का दिली जात नाही मुद्दाम लपवून ठेवली जाते का