आरोग्यवर्धिनी केंद्र ,बोरपाडळे येथे सॅनिटायझर स्पिंकलर फवारणी कक्षाची उभारणी
बोरपाडळे ( प्रतिनिधी ) कोरोनाचा व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सातवे जिल्हा परिषदचे सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या फंडातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य सुरक्षितेसाठी बोरपाडळे ( ता पन्हाळा ) येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे सॅनिटायझर स्पिंकलर फवारणी कक्षाची उभारणी करण्यात आली.
बोरपाडळे आरोग्य वार्थिनी केंद्र येथे जनरल रुग्ण तपासणी, स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया या सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे बोरपाडळेच्या आसपासच्या २८ गावातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण येथे मोठया प्रमाणात उपचारासाठी येतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या बरोबरच रुग्णालयातील कर्मच्याऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवाजीराव मोरे यांच्या फंडातून या रुग्णालयात निर्जतुकीकरण कक्ष उभे केले आहे. या सेवेचा प्रारंभ जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते झाला. या निर्जतुकीकरण कक्षातुनच सर्व रुग्णांना जावे लागत आहे. येथे डिजिटल फलकावर कोरोनाबाबत प्रबोधनदेखील करण्यात आले आहे.
यावेळी डॉ.रोहिणी पोवार,डॉ ऑचल रंगारे,सरपंच गिताजंली कोळी,उपसरपंच शरद जाधव,तंटामुक्त अध्यक्ष अतूल पाटील, सदस्य सौरभ निकम, सुदिप पाटील, राकेश साठे,संपत पाटील, गोपाळ पाटील, औषध निर्माण अधिकारी केशव पावरा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुधाकर जाधव, क्लार्क के पी मेंडके तसेच भागातील व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते
96