कोल्हापूर

प,पु,सदगुरु चिले महाराज भंडारा महोत्सव यावर्षी रद्द

by संपादक

प,पु,सदगुरु चिले महाराज भंडारा महोत्सव यावर्षी रद्द
पन्हाळा वार्ताहर (दत्तात्रय बोबडे )प,पु,सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पैजारवाडी येथील भंडारा महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे.तरी भाविकभक्तांनी याची नोंद घेवून मंदिर परिसरात न येण्याचे आवाहन ट्रस्ट्रतर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी सदगुरू चिले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टतर्फे भंडारा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या भंडारा महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.या भंडारा महोत्सवाच्या निमित्ताने लाखो भक्त पैजारवाडीत दाखल होतात.यंदा मात्र कोरोना साथीमुळे मंदिर दर्शन तथा भाविकांना इतर विधी साठी शासकीय आदेशानुसार बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापन सर्व विधी शासकीय आदेशानुसार दररोज पुर्ण करत असून कोणीही भाविकांनी घराबाहेर न पडता घरीच नामस्मरण व पुजा अर्चा नैवेद्य करून आपली सेवा स्वःताचे घरी करून प्रशासन तसेच मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे. असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
भंडारा उत्सवाचा मंगळवार दि. २१ रोजी मुख्य दिवस असून सर्व पुजा, कार्य,विधी ,मंदिर प्रशासना मार्फतच पुर्ण होतील. भाविकांसाठी प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहिल याची सर्व भक्तानी नोंद घ्यावी.

You may also like

1 comment

Datta bobade एप्रिल 21, 2020 - 10:39 am

मस्त बातमी

Reply

Leave a Comment