Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

*प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय योजनांबाबत ‘आयुष’ समिती*
*50 वर्षापुढील 11 लाख नागरिकांचे ॲपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण*
* कोल्हापूर (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ५० वर्षापेक्षा जास्त असलेल्या व विविध व्याधीग्रस्त नागरिकांमध्ये कोविड-19 विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाय योजना सुचविण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुष समिती स्थापन केली. या समितीने उपाय योजनांबाबत येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.*
सद्यस्थितीत उपलब्ध वैद्यकीय निरिक्षणाप्रमाणे कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी शरीरात रोग प्रतिकार शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व विविध व्याधिग्रत नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त होण्याची शक्यता असल्याने त्यांचे बाबतीत वेळीच खबरदारीच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, दमा, क्षय रोग तसेच इतर श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोव्हिड १९ विषाणू प्रतिबंधक प्रतिकारशक्ती व सर्वसाधारण रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाययाजना हाती घ्यावयाच्या आहेत.
यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळी यांच्या अध्यक्षतेखाली आयुष समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून जनरल पॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी पार्टे, होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मोहन गुणे, जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत रेवडेकर, महानगरपालिका आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी डॉ.पुनम वळंजु हे तर आयुष अधिकारी डॉ. नाळे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
या समितीने जिल्हयातील ५० वर्षापेक्षा जास्त वय त्याचप्रमाणे व्याधीग्रस्त रुग्णांमध्ये सर्वसाधारण रोग प्रतिकारकशक्ती वाढून अशा व्यक्ती कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत होणार नाहीत यासाठी कोणकोणत्या उपाय योजना आवश्यक आहेत, यावर वैद्यकीयदृष्टया अभ्यास करावा. तसेच याबाबत केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडील विविध मार्गदर्शक सूचनांचा साकल्याने अभ्यास करुन हाती घ्यावयाच्या उपाययोजना सुचवाव्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोल्हापूर जिल्हयातील अशा वयाने जेष्ठ व व्याधीग्रस्त व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येईल. अशा व्यक्तींची एकूण संख्या अंदाजे ११ लाख इतकी आहे. या व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी मोबाईलवर आधारित “आयुष ” नावाने एक अॅप विकसीत करण्यात येत आहे. ते येत्या दोन-तीन दिवसात कार्यान्वित केले. जाईल. त्यापुर्वी जिल्हयातील काही भागात असे सर्वेक्षण प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येईल व नागरिकांचे समुपदेशन करण्यात येईल.
*या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल.*
** संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे समुपदेशन.*
** निर्धारीत गटांच्या सर्व व्यक्तींचे आशा, अंगणवाडी कर्मचारी यांचेमार्फत मोबाईल आधारीत **“**आयुष” अॅपव्दारे सर्व्हेक्षण.*
** सर्व्हेक्षणातील सर्व नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत समुपदेशन. परिपूर्ण माहिती पत्रकही देणार.*
** सर्व्हेक्षणातील सर्व नागरिकांना समितीने सुचविलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे साधने देणार*
** सर्व्हेक्षणातील सर्व व्यक्तींच्या आरोग्याचा आढावा आणि समुपदेशन*

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.