होमिओपॅथी आणि कोरोना-डॉ. पावसे
आज जगातील सर्वच देशांनी खरच प्रगती केली आहे. कितीही मोठा शत्रू आला तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रचंड ताकतीची क्षेपणास्त्र, अत्याधुनिक युद्धसामग्री अगदी अणुबॉंम्ब पर्यंतची निर्मिती झाली पण एका सूक्ष्म अशा शत्रूंनी आज संपूर्ण जगाला स्तब्ध केले आहे. काही राष्ट्रांनी तर या शत्रु पुढे गुडघे टेकले. असा हा एकाच वेळी संपूर्ण जगाला डोकेदुखी ठरलेला आजार म्हणजे covid-19 अर्थात कोरोना व्हायरस. आपल्या सर्व भारतीयांच्या सुदैवाने म्हणा, राजकीय जलद निर्णयांमुळे म्हणा, पोलिसांच्या काट्यामुळे म्हणा किंवा अहोरात्र जीव धोक्यात घालून दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टर्स नर्सेस आणि सगळ्यात कर्मचाऱ्यांमुळे म्हणा किंवा प्रशासकीय सेवेमधील कौशल्याने म्हणा अथवा आपल्या भारतीय लोकांमधील रोगप्रतिकारक शक्ति मुळे म्हणा या आजाराला आपल्या देशांमध्ये त्याचे उग्र रूप धारण करता आलेले नाही. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की हा व्हायरस तितका घातक नाही किंवा त्याला इतकी घाबरण्याची गरज नाही पण खरंतर घाबरण्याची गरज आहे. हा आजार झाल्यावरती कोणती लक्षणे येतात हे सगळ्यांनाच माहीत आहे परंतु हा विषाणू शरीरामध्ये गेल्यावरती नेमकं काय होतं ते आता बघू….
जेव्हा या जंतूचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश होतो तेव्हा तो आपल्या पेशीमधील हिमोग्लोबिन ला चिकटून बसतो हिमोग्लोबिन दोन घटकांनी बनलेले असते (ग्लोबिन घटक अर्थात प्रोटीन आणि दुसरा हीम घटक अर्थात लोह याशिवाय हे हिमोग्लोबिन शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करत असते) हा चिकटलेला जंतू झटकून टाकण्याच्या प्रयत्नांमध्ये हिमोग्लोबिन मधील लोहाचे कोण सुटे होऊन रक्तात मिसळतात, त्यामुळे हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. यावर उपाय म्हणून ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिन मध्येच बिघाड झाल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा वाढत जाऊन रुग्णाची प्रकृती आणखीच खालावते. वाढत्या लोह कणांमुळे लिव्हर वर ताण पडतो आणि प्रकृती झपाट्याने बिघडू लागते. हिमोग्लोबिनची परिणामकता कमी होत जाणे आणि अति महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन न मिळणे यामुळे फुफ्फुसांन बरोबरच इतर अवयव निकामी होत जातात आणि काही वेळेला मृत्यू ओढवतो.
होमिओपॅथी आणि कोरोना
होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनिमान यांनी त्यांच्या ऑर्गानोन ऑफ मेडिसिन या पुस्तकामध्ये महामारी सारख्या परिस्थिती मध्ये औषधोपचार कसे केले जातात याचे मार्गदर्शन केले आहे आणि याचाच आधार घेऊन जगभरातील होमिओपॅथिक डॉक्टर या आजारावर ती उपचार करत आहेत आणि ही औषधे ह्या आजारांविरुद्ध अतिशय उपयुक्त ठरत आहेत.
याचे काही दाखले खाली देत आहे – भारतीय आयुष मंत्रालयाने ही औषध सर्वांना घेण्याचे आवाहन केले आहे – केरळसारख्या राज्याने ही औषध प्रभावीपणे वापरून त्यांची साथ आटोक्यात आणण्यामध्ये यश मिळवले आहे. – इटली, ब्राझील आणि इतर अनेक देशांमध्ये या औषधांची उपयुक्तता अधोरेखित होत आहे. – या औषधांची उपयुक्तता बघून बजाज ऑटो चे मालक राजीव बजाज यांनी स्वतःच्या खर्चाने सर्व भारतीयांना ही औषधे देण्याची तयारी दाखवली आहे.
त्यामुळे माझे सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण ही प्रतिबंधात्मक औषध नक्की घ्या आणि आपल्या परिवाराला आजारापासून दूर ठेवा. याशिवाय सोशल डिस्टन्ससिंग, सकस आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
डॉ. श्यामप्रसाद पावसे (MD होमिओपॅथी) श्री सिद्धी होमिओपॅथिक क्लिनिक, कोडोली,कोल्हापूर
67