कोल्हापूर

डॉ. सिद्धाराम सुनगार यांच्यावर गुन्हा दाखल, होम क्वारंटाईन असताना सीपीआर मधून पलायन

by संपादक

डॉ. सिद्धाराम सुनगार यांच्यावर गुन्हा दाखल होम क्वारंटाईन असताना सीपीआर मधून पलायन
कोडोली (प्रतिनिधी) संचारबंदी आदेश मोडून कर्नाटकातून कोडोली (जि. कोल्हापूर) येथे आलेल्या डॉ. सिद्धाराम सुनगार व अरविंद सावंत यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील १४४ अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद डॉ.एस. बी. पाटील यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यात २२ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत आपत्कालीन परिस्थिती व्यतिरिक्त नागरिक व वाहनांना बाहेर जाणे व आत प्रवेश करण्यास बंदी आदेश असताना डॉ. सिद्धाराम सुनगार बंदी आदेश मोडून कर्नाटक येथुन कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथे आला. या ठिकाणी साळी गल्लीमध्ये डॉ. सुनगार याचे डेंटल हॉस्पिटल आहे. त्यांने हॉस्पिटल सुरू करून दोन रुग्ण तपासले असता डॉ.सुनगार हा कर्नाटकातून आल्याची माहिती कोडोली कोरोना ग्रामस्थर समितीला समजताच समितीने होम क्वारंटाईन पथक पाठविले परंतु या पथकाला हुलकावणी देऊन डॉक्टरने गाडीतून पलायन केले. पण समितीने एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडून कोडोली उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी, यांनी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले .परंतु आरोपी डॉ. सिद्धाराम सुनगार यांने ते न मानल्याने पोलिस व ग्रामसमितीने आरोपी डॉ. सिध्दाराम सुनगार यास सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना संस्थात्मक विलगीकरण करून श्री बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ येथे पाठविण्याची शिफारस केली परंतु आरोपी डॉ. सुनगार व त्यांचा भाचा अरविंद सावंत हे दोघेही विलगीकरण कक्षात न जाता रुग्णालयाच्या आवारातून कोणतीही माहिती न देता परस्पर निघून गेल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी कोडोली पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार कोडोली पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.

You may also like

Leave a Comment